CoronaVirus Live Updates : "100 दिवस टिकणार कोरोनाची दुसरी लाट, 70 टक्के लसीकरण अत्यावश्यक"; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:18 AM
1 / 16 देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे. देशात कोरोनाचा वेग वाढला असून चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. 2 / 16 भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,45,26,609 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,75,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 3 / 16 शनिवारी (17 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,34,692 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,75,649 वर पोहोचला आहे. 4 / 16 देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 16,79,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,26,71,220 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना लसीकरण देखील वेगाने होत आहे. 5 / 16 दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांसाठी एका तज्ज्ञाने (Expert) तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूची दुसरी लाट अजून 100 दिवस कायम राहू शकते. तसेच 70 टक्के कोरोना लसीकरण अत्यावश्यक असल्याचं देखील म्हटलं आहे. 6 / 16 हर्ड इम्युनिटीमुळे लोकांना संसर्गजन्य रोगांपासून अप्रत्यक्ष संरक्षण मिळतं. लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर बरं झाल्यानंतर लोकांची प्रतिकारक शक्ती विकसित होते. लोकांच्या सामूहिक रोग प्रतिकारक शक्तीला हर्ड इम्यूनिटी म्हणतात. 7 / 16 डॉ. नीरज कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमध्ये लोकांची प्रतिकारक शक्ती कमी करण्यासोबतच लसीचा प्रभाव कमी करण्याची क्षमता देखील या व्हायरसमध्ये आहे. 8 / 16 कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन पूर्वीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक संक्रामक आहे. त्यामुळे ज्या लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा लोकांनाही कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. 9 / 16 डॉ. कौशिक यांच्या मते, म्युटेटेड कोरोना व्हायरस इतका संसर्गजन्य आहे, की तो जर घरातील एका व्यक्तीला झाला तर संपूर्ण कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो. हा विषाणू लहान मुलांसाठी देखील घातक आहे. 10 / 16 कोरोनाचा हा व्हायरस आरटी-पीसीआर सारख्या चाचण्यांमध्ये देखील सापडत नाही. तथापि, वास न येणं कोरोनाची लागण झाल्याचं एक लक्षण आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट 100 दिवसांपर्यंत टिकू शकते. 11 / 16 जोपर्यंत 70 टक्के लोकांच लसीकरण होतं नाही आणि हर्ड इम्युनिटी वाढत नाही, तोपर्यंत अशा लाटा येतच राहतील. त्यामुळे मास्क वापरणे हा पर्याय आहे अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 16 कोरोनाच्या संकटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानाच्या जोधपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे की, दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. 13 / 16 वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सीएमएचओच्या रिपोर्टनुसार, शहरात 770 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय चार कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. 14 / 16 जोधपूर आयआयटीमध्ये 74 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जोधपूर शहरातील राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्येही कोरोना विस्फोट झाला आहे. 15 / 16 राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या एकूण 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वसतिगृहात कोरोना विस्फोट झाल्यानंतर वसतिगृह परिसराला कंटेनमेंट झोन घोषित केलं आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्येच आयसोलेट करण्यात आलं आहे. 16 / 16 सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस जरी कोरोना संसर्ग झाला असेल आणि तो वेळेत आयसोलेट झाला नाही झाला, तर तो संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. आणखी वाचा