शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 7:44 PM

1 / 11
सरकारने कंस्‍ट्रक्‍शन, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्यासाठी लॉकडाउन 3.0मध्ये बरीच सूट दिली होती. मात्र, असे असतानाच अनेक राज्‍यांनी व्हायरसला आळा घालण्यासाठी मोठ-मोठ्या भागांत प्रतिबंध लावले होते.
2 / 11
17 मेनंतर काय होणार? यासंदर्भात सरकार प्‍लॅन तयार करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंध लावण्याऐवजी केवळ, ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्त आहेत, अशाच ठिकाणी लॉकडाउन करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे.
3 / 11
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट कमी करण्यासाठी कंटेन्मेंट झोन्‍स बाहेर आर्थिक व्यवहार करायला मंजुरी दिली जाऊ शकते.
4 / 11
आर्थिक व्यवहार जवळपास ठप्पच - लॉकडाउन 3.0मध्ये केंद्र सरकारने काही अटींवर व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, कंस्‍ट्रक्‍शन्सच्या कामांना गती मिळू शकलेली नाही. तेथे मजुरांची कमतरता भासत आहे. या शिवाय मॅन्युफॅक्चरिंगदेखील म्हणावे तसे सुरू झालेले नाही.
5 / 11
काही बाबतीत दिसतोय पॉझिटिव्ह ट्रेंड - लॉकडाउनपूर्वी रोज जवळपास 22 लाख ई-वे बिल्‍स जनरेट होत होते. आता ही संख्या 6 लाखवर आली आहे. मात्र, असे असले तरी गेल्या तीन आठवड्यात यात जवळपास 100 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जो चांगला ट्रेंड आहे. तीन आठवड्यांपूर्वी दिवसाला 3.2 ई-वे बिल्स जनरेट होत होते.
6 / 11
'मोठे भाग बंद करणे योग्य नाही' - मोठ-मोठे भाग बंद करणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे, एका मोर्चावर कोरोनाचा सामना, तर दुसऱ्या मोर्चावर आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी, नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत, सरकारमध्ये तयार होत आहे.
7 / 11
कोरोना हॉटस्‍पॉट वगळून इतर ठिकाणी दिली जाऊ शकते सूट - केंद्र सरकारने लॉकडाउन 3.0साठी जे नियम तयार केले होते. त्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अनेक प्रकारचे व्यवहार करण्याची परवानगी दिली होती. यात नियमित वेळेवर दुकान उघडणे आणि लोकांना बाहेर येण्याची सूट देणे या महत्वाच्या गोष्टी होत्या.
8 / 11
ग्रीन झोनमध्ये बसची सुविधा आणि इंडस्‍ट्रीज सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आली होती. मात्र, सावधगिरी म्हणून बऱ्याच राज्यांनी एवढी सूट दिली नाही. आता लॉकडाउन वाढलेच तर नव्या निर्देशांप्रमाणे सरकार, केवळ कंटेन्मेंट झोनमध्येच प्रतिबंध कायम ठेऊ शकते. यानंतर, सावधगिरीने जनजीवन पुन्हा सुरळित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाऊ शकतात.
9 / 11
आता कोरोनासोबतच जगण्याची सवय लावावी लागेल, असे सरकारने अनेकदा म्हटले आहे. या संकटातून सावरण्यासाठी सावध राहणे हाच खरा उपाय आहे. व्हॅक्‍सीन तयार होण्यात आणि ती सर्वांपर्यंत पोहोचायला उशीर लागणार आहे. तोवर देशाला लॉकडाउनमध्ये ठेवले जाऊ शकत नाही.
10 / 11
सोशल डिस्‍टंसिंग आणि मास्क बनेल शस्त्र - लॉकडाउन उठल्यानंतर, सोशल डिस्‍टंसिंग आणि मास्‍क हे जीवनाचे भाग बनायला हवेत. अन्यथा व्हायरस पसरण्याचा धोका तेवढाच राहील. हीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सांगितली आहे.
11 / 11
घराबाहेर पडताना लोकांना सजग आणि सावध राहावे लागेल. सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायधर्सची व्यवस्था करावी लागेल. याशिवाय, संभाव्य कोरोनाबाधितांची तपासणी आणि त्यांच्या रिकव्हरीसाठी हेल्‍थ इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर अधिक चागले करणे आवश्यक आहे.