शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 12:33 PM

1 / 5
गेल्या २४ तासांत दिवसभरात देशात ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
2 / 5
सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ९३ हजार ७३३ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ७३ हजार ९५२ झाली आहे. आतापर्यंत ३ कोटी ४० लाख ८९ हजार १३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
3 / 5
राज्यात मंगळवारी ६९९ रुग्ण आणि १९ मृत्यूची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १ हजार ८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ६४ लाख ८८ हजार ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
4 / 5
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के आहे. तर मृत्यूदर २.१२ टक्के आहे. सध्या राज्यात ओमायक्रोनचे १० रुग्ण सापडले आहेत.
5 / 5
दरम्यान, कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांची चिंता वाढवली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळले आहेत. याचवेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोकांना लसीचा अतिरिक्त डोस देण्याची मागणी केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन