शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:54 AM

1 / 7
लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या प्रवाशांना काही दिलासा मिळाला आहे.
2 / 7
मात्र आज पहिल्याच दिवशी विमान प्रवास करण्यासाठी आलेल्या मोजक्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. राजधानी दिल्लीसह देशातील विविध विमानतळावरून होणारी काही उड्डाणे ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा त्रास सहन करावा लागला.
3 / 7
दिल्लीतून पोर्ट ब्लेअर, कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि इंदूरला जाणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली. दिल्लीतून जाणारी एकूण ८० विमाने रद्द झाली.
4 / 7
अनेक अडथळ्यानंतर मुंबईतूनही आजपासून विमानसेवा सुरू झाली. मात्र मुंबईतूनही आसाममधील गुवाहाटी येथे जाणारे विमान रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली. (छाया. दत्ता खेडेकर)
5 / 7
मुंबई विमानतळावरील एका प्रवाशाने सांगितले की, ऑनलाइनवर विमान वेळेवर उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात येत होते. तर विमानतळावर आल्यावर सांगण्यात आले की, विमान रद्द झाले आहे. आधी माहिती असते तर मी विमानतळावर आलो नसतो.
6 / 7
दिल्ली विमानतळावरून आज ३३२ विमाने टेकऑफ आणि लँडिंग करणार होती. मात्र यामधील ८२ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्ली विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, त्याला गुवाहाटीला जायचे होते. मात्र विमानतळावर आल्यावर विमान रद्द झाल्याचे कळले.
7 / 7
तर दिल्ली विमानतळावर एक प्रवास जम्मूवरून विमानाने आला. त्याला पश्चिम बंगालला जायचे होते. मात्र बंगालला जाणारी विमाने २८ मेपर्यंत रद्द असल्याचे त्याला विमानतळावर आल्यानंतर समजले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळairplaneविमानdelhiदिल्लीMumbaiमुंबई