CoronaVirus Marathi News 10,000 dead in 10 days due to corona virus in india
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! देशात 10 दिवसांत तब्बल 10,000 जणांचा मृत्यू; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 9:19 AM1 / 14कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे2 / 14जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 3 / 14देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 32 लाखांच्या वर गेला आहे. 4 / 14देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. याच दरम्यान कोरोनाचा धक्कादायक ग्राफ समोर आला आहे.5 / 14गेल्या 10 दिवसांत देशात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाला जवळपास 1000 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. 6 / 14देशातील रुग्णसंख्या रोज नवा उच्चांक गाठत असून 32 लाखांचा टप्पा आता पार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे अनेक नवे रुग्ण आढळून आले आहेत. 7 / 14देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 लाख 34 हजार 475 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 59,449 वर पोहोचला आहे. 8 / 14देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 7,07,267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 24,67,759 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 9 / 14कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणं दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.10 / 14देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. 11 / 14कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढणे व संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचविणे या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटलं आहे. 12 / 14देशातील विविध रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 13 / 14महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल आणि आसाममध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 14कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications