11,11,11! कोरोनाचा अजब योगायोग; 22 हजार रुग्ण, नागपूर लॉकडाऊन पुन्हा घाबरवणारा तर जगभरात... By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 3:33 PM1 / 18जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. 2 / 18कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 2,633,324 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 11 कोटींवर पोहोचला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 118,689,924 झाली आहे. 3 / 1894,299,923 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेसह इतरही काही देशांत या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 4 / 18जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. गेल्या वर्षी 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं होतं. आज त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. 5 / 18कोरोनाचा वेग थोडा मंदावत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.6 / 18भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,12,85,561 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 22,854 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 126 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 / 18कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,58,189 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय घेण्यात येत असून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. 8 / 18देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या (Covid-19) संख्येवरुन प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. 9 / 18नागपुरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत नागपुरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. 10 / 18नागपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाऊन काळात नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे. 11 / 18गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतो आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस देण्यात आली. त्यानंतर आता सर्वसामान्यांना देण्यात येत आहे. 12 / 18कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात याबाबत शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. 13 / 18मोदींनी एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. 14 / 18बंगळुरूच्या 103 वर्षीय कामेश्वरी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोनाची लस घेणाऱ्या त्या देशातील सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत. कर्नाटकमध्ये राहणाऱ्या कामेश्वरी (J.Kameshwari) यांनी बन्नेरघट्टा रोड येथील अपोलो रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. 15 / 18कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंगसारखे खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिलनाडू, गुजरात आणि कर्नाटकमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 16 / 18देशात सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास यंदाची होळी ही 'सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना' ठरू शकेल असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. 17 / 18कोरोनाच्या बाबतीत आता जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यांपासून दूर राहिलं पाहिजे. विशेषत: होळीच्या वेळी. कारण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही.18 / 18होळीच्या काळात सध्याच्या तुलनेत अनेक पटीने रुग्णसंख्या वाढू शकतात. यामुळे प्रशासनाने दिलेले सूचनांचं पालन नागरिकांनी करणं गरजेचं आहे. तसेच कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसल्याने काळजी घेणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications