शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : सलाम! ....म्हणून वडिलांसाठी 'ती' झाली श्रावणबाळ; 7 दिवस केला तब्बल 1000 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 4:10 PM

1 / 12
कोरोनाच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.
2 / 12
देशभरात 31 मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहे.
3 / 12
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचली आहे. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 3303 वर पोहोचली आहे.
4 / 12
लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. विविध पर्याय वापरून ते आपलं गाव गाठत आहेत. मात्र याच दरम्यान हृदयद्रावक घटना या समोर येत आहेत.
5 / 12
सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो हे जोरदार व्हायरल होत आहेत. एक 15 वर्षांची मुलगी ही आपल्या वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचं चित्र या फोटोंमध्ये दिसत आहे.
6 / 12
ज्योती कुमारी असं या 15 वर्षीय मुलीचं नाव असून तिने आपले वडील मोहन पासवान यांना घेऊन सायकलवरून 7 दिवस तब्बल 1000 किलोमीटरचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे.
7 / 12
ज्योतीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर डबलसीट घेऊन गुरुग्राम ते बिहार असा प्रवास केला आहे. तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास तिने सायकलवरून पूर्ण केला.
8 / 12
ज्योती शाळेत शिकते. तर तिचे वडील ही गुरुग्राममध्ये ई-रिक्षा चालवायचे. मात्र त्याचा अपघात झाला आणि ते जखमी झाले.
9 / 12
लॉकडाऊनमध्ये पैसे संपले तसेच घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे तिने सायकलने प्रवास करायचा असं ठरवलं.
10 / 12
ज्योतीने आपल्या आजारी वडिलांना घेऊन बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने एक सायकल देखील खरेदी केली.
11 / 12
सायकलसाठी ज्योतीकडे पैसे नव्हते मात्र दुकानदाराला नंतर पैसे देते असं सांगून तिने सायकल घेतली आणि आपला प्रवास सुरू केला.
12 / 12
आजारी वडिलांना घेऊन तिने गुरुग्राममधून सायकलने आपला प्रवास सुरू केला आणि सात दिवसांनी ते त्यांच्या घरी सुखरुप पोहोचले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारCyclingसायकलिंगIndiaभारतDeathमृत्यू