1 / 17जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. 2 / 17तब्बल 57 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे.3 / 17भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या वर पोहोचला आहे. तर 4000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 4 / 17कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. 5 / 17कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.6 / 17भारतात कोरोनाविरूद्ध 9 औषधांची चाचणी सुरू आहे. नीति आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल यांनी याबाबत माहिती दिली.7 / 17देशातील सुमारे 20 नवीन कंपन्या कोविड 19 साठी चाचणी किट बनवित आहेत. जुलैपर्यंत देशात दररोज 5 लाख देशी किट तयार होतील. कोरोनाच्या विरूद्ध भारत अनेक लस चाचण्या घेत असल्याची माहिती पॉल यांनी दिली.8 / 17फेवीपेरावीर हे अँटी व्हायरल औषध आहे. हे औषध तोंडातून घेतले जाते. याची चाचणी केली जात आहे.9 / 17फायटो फार्मास्युटिकल हे एका झाडाशीसंबंधित एक भारतीय प्रोडक्ट आहे. एसीक्यूएच असं त्याचं नाव आहे. त्याची चाचणी सीएसआयआरच्या प्रयोगशाळेत केली जात आहे.10 / 17इटोलीजुमॅब हे एक औषध आहे. हे संधिवातात दिले जाते.11 / 17व्ही के पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान असताना ही लस घेतली आहे. जर ही लस पुन्हा घेतली तर त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढते. 12 / 17मायक्रोबॅक्टेरियम डब्ल्यू हे औषध रोग प्रतिकारशक्ती वाढवते.13 / 17आर्बिडॉल या औषधाचीही चाचणी सुरू आहे. 14 / 17कोरोनाच्या लढ्यात रेमडिसिविर हे औषध महत्त्वाचं मानलं जात आहे. 15 / 17कॉन्व्हेसलेंट प्लाझ्मा ट्रायल आयसीएमआरच्या देखरेखीखाली सुरू आहे.16 / 17हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध हे मलेरिया विरोधी औषध आहे. दीर्घ काळापासून भारतात मलेरियाविरूद्ध वापरले जात आहे.17 / 17कोविड 19 विरुद्धची अंतिम लढाई केवळ लसीद्वारेच जिंकली जाईल. आपल्या देशात त्यासाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती व्ही के पॉल यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.