CoronaVirus Marathi News 9 month pregnant nurse attend patients hospital SSS
CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 1:21 PM1 / 14भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 70,000 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 2200 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. 3 / 14कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. याच दरम्यान 9 महिन्यांची गर्भवती नर्स कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहे. 4 / 14रूपा राव असं या 9 महिन्यांच्या गर्भवती नर्सचं नाव असून ती कर्नाटकातील शिवमोगा येथे राहते. 5 / 14कर्नाटकातील एका सरकारी रुग्णालयात दररोज 6 तास ड्यूटी करून ती कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहे. 6 / 14पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रूपा राव यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 7 / 149 महिन्यांच्या या गर्भवती रुपाला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र तरी ती कोरोनाग्रस्तांसाठी 6 तास काम करत आहेत.8 / 14'सरकारी रुग्णालयात आजूबाजूच्या गावातील लोक येतात. त्यामुळे लोकांना माझी गरज आहे. माझ्या वरिष्ठांनी मला सुट्टी घेण्यास सांगितले होते. मात्र मला लोकांची सेवा करायची आहे' असं रुपा यांनी म्हटलं आहे. 9 / 14रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्वांनीच रुपाच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. 10 / 14गजानुरू गावात राहणारी रूपा रोज रुग्णांची सेवा करण्यासाठी थिरथाहल्लीच्या सरकारी रुग्णालयात येते. न थकता, न थांबता रुग्णांची सेवा करते. 11 / 14काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावे यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सने तब्बल 250 किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना समोर आली होती. 12 / 14विनोथिनी असं या 25 वर्षीय नर्सचं नाव असून ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला आहे. 13 / 14रामनाथपुरम येथील स्वास्थ सेवा संयुक्त निर्देशक यांचा कॉल आला. कोरोना रुग्णांवर उपचारासंदर्भात तो कॉल होता. विनोथिनीने वेळ वाया न घालवता प्राथमिक स्वास्थ रुग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल 250 किमी प्रवास करुन ती रुग्णालयात पोहोचली. 14 / 14कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications