शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 6:56 PM

1 / 14
जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा साडे तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे.
2 / 14
जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 64 लाखांवर गेला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.
3 / 14
भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या वर गेली आहे. तर पाच हजारांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
4 / 14
कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
5 / 14
कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.
6 / 14
भारतात आणखी एक औषधं ही कोरोना व्हायरला टक्कर देत असल्याची माहिती समोर आली आली आहे. रेमडेसिवीर हे औषध कोरोनावर उपयुक्त असल्याचं म्हटलं जात आहे.
7 / 14
भारतात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controller General of India) ही मंजुरी दिली आहे.
8 / 14
अमेरिकेतील गिलियड सायन्स कंपनीचं हे औषध आहे. एबोलासाठी हे औषध तयार करण्यात आलं, जे आता कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे.
9 / 14
अमेरिकेनंतर आता भारतातही रेमडेसिवीर हे औषध वापरलं जाणार आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांनाही हे औषध दिलं जाणार आहे.
10 / 14
सामान्यपणे रुग्णांना दहा दिवस हे औषध दिलं जातं मात्र भारतात फक्त 5 दिवस या औषधाचा डोस मर्यादित ठेवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला. तर यापैकी 50 टक्के म्हणजेच तब्बल 1 लाख 303 लोक कोरोनातून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
12 / 14
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
13 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.
14 / 14
कोरोनामुळे आतापर्यंत 382,709 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,463,647 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूmedicinesऔषधंAmericaअमेरिका