शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : तुमच्या घरात 'विषारी सॅनिटायझर' तर नाही ना?; CBI ने केलं अलर्ट, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 2:26 PM

1 / 12
जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन लाखांच्या वर गेली असून नऊ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 12
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे.
3 / 12
सॅनिटायझरचा वापर सध्या मोठया प्रमाणात केला जात आहे. प्रत्येकाच्या जवळ सॅनिटायझर असतंच. मात्र आता सॅनिटायझरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
4 / 12
लोक कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत. सॅनिटायझरचा तुडवडा निर्माण झाला असून त्याच किंमत वाढली आहे. अनेक ठिकाणी बनावट सॅनिटायझरची विक्री केली जात आहे.
5 / 12
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सॅनिटायझरबाबत लोकांना अलर्ट केलं आहे. बऱ्याच ठिकाणी विषारी सॅनिटायझर विकते जात असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.
6 / 12
अत्यंत विषारी मिथेनॉलचा वापरुन हँड सॅनिटायझर तयार केले जात आहे. त्याचबरोबर पीपीई किट आणि कोरोना व्हायरसशी संबंधित महत्त्वाचं सामान देखील तयार केलं जात आहे.
7 / 12
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, CBI ने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच अशा बनावट, घातक हँड सॅनिटायझरपासून सावध राहण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे.
8 / 12
देशावर कोरोनाचं मोठं संकट आलेलं असताना पैसे कमवण्यासाठी काही लोक अशा मार्गाचा अवलंब करत आहेत. मात्र हे घातक सॅनिटाझर वापरणं धोक्याचं आहे.
9 / 12
एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक पीपीई किट आणि कोरोना विषाणूशी संबंधित उपकरणांचे निर्मिती करण्यासाठी रुग्णालय व आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
10 / 12
आवश्यक असलेल्या या वस्तूंच्या कमतरतेचा फायदा घेऊन रुग्णालयांकडून ऑनलाईन पेमेंट मिळते, परंतु पैसे घेतल्यानंतरही ते मालाचा पुरवठा करत नाहीत.
11 / 12
मिथेनॉलपासून हे बनावट सॅनिटायझर तयार केले जात असून, मिथेनॉल हा एक अतिशय विषारी पदार्थ आहे. त्यामुळे हात स्वच्छ करण्यासाठी अशा सॅनिटायझरचा वापर करू नका.
12 / 12
काही ठिकाणी मिथेनॉल असलेले सॅनिटाझर विकले जात आहेत. त्यामुळे लोकांनी वेळीच सावध होण गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCBIगुन्हा अन्वेषण विभागIndiaभारतDeathमृत्यू