1 / 15कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर गेला आहे.2 / 15देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 3967 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 81,970 वर पोहोचली आहे.3 / 15कोरोनामुळे देशात 2649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 51401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 27920 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.4 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदरी घेण्यात येत आहे. देशात आतापर्यंत 20 लाख नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज जवळपास 1 लाख सँपलची टेस्ट करण्यात येत आहे. 5 / 15देशातील 504 सरकारी आणि खासगी लॅबमध्ये ही टेस्ट केली जात आहे. कमी वेळेत जास्त टेस्ट करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.6 / 15सरकारने COBAS 6800 मशीन मागवले आहे. या मशीनच्या मदतीने आता जास्त कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट करता येणार आहेत. 7 / 15लवकर कोरोना टेस्ट करणारे भारतात दाखल झालेले हे पहिले अत्याधुनिक मशीन आहे.8 / 15केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी गुरुवारी हे मशीन नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलकडे (NCDC) सुपूर्द केले. 9 / 15मशीन रोबोटिक्सने परिपूर्ण आहे. त्यामुळे हेल्थकेअर वर्कर्सला इन्फेक्शनची धोका निर्माण होणार नाही.10 / 15मशीनमुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याची माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. 11 / 15COBAS 6800 मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम BSL2 आणि नियंत्रण लेव्हलच्या लॅबची आवश्यकता असते. मशीन कोणत्याही फॅसिलिटीवर ठेवता येत नाही. 12 / 15COBAS 6800 व्हायरल हेपेटाइटिस बी अँड सी, एचआयव्ही, एमटीबी, पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लॅमायडिया आणि नेयसेरेमिया सारख्या आजारांचीही टेस्ट करते.13 / 15जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ती 45 लाखांच्या वर गेली आहे. 14 / 15कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 303,405 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. 15 / 15कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर गेला आहे.