शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता घरबसल्या शेतमालाची विक्री, सरकारने लाँच केलं अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 3:12 PM

1 / 15
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.  
2 / 15
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 40 हजारांच्या वर गेला आहे. तर 1100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज  झाला आहे.
3 / 15
लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग धंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले आहेत. तसेच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.
4 / 15
शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता घरबसल्या त्यांना शेतमालाची विक्री करता येणार आहे. सरकारने यासाठी एक अ‍ॅप लाँच केलं आहे. 
5 / 15
किसान सभा अ‍ॅप असं या अ‍ॅपचं नाव असून या अ‍ॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शेतमालाची विक्री करता येणार आहे.
6 / 15
किसान सभा अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांच्या समस्या  दूर होण्यास मदत होणार आहे. औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) हे अ‍ॅप विकसित केले आहे. 
7 / 15
शेतकरी, बाजार समितीतील विक्रेते, वाहतूकदार, भाजी बाजारातील मंडळ सदस्य, सेवापुरवठादार आणि ग्राहक हे किसान सभा अ‍ॅपचे सहा घटक असणार आहेत.
8 / 15
लॉकडाऊनमध्ये शेतमाल बाजारात पाठविणे, बियाणे व खते, शेतमालाला योग्य भाव यासाठी हे अ‍ॅप महत्त्वपूर्ण आहे. 
9 / 15
किसान सभा अ‍ॅपचे उद्घाटन आयसीएआरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांच्या हस्ते करण्यात आले. 
10 / 15
आयसीएआर आणि सीएसआयआर यांनी एकत्र काम करून कृषी विज्ञान केंद्रांचे नेटवर्क या कामासाठी वापरावे, अशी सूचना त्यांनी केली. 
11 / 15
शेतकरी, वाहतूकदार, सेवापुरवठादार (खते, बी-बियाणे यांचे विक्रेते, शीतगृहे, गोदाम मालक, मंडईतील विक्रेते) तसेच ग्राहक (किरकोळ विक्रेते, ग्राहक) यांना हे अ‍ॅप प्रत्यक्ष जोडते.
12 / 15
खते, बी-बियाणे विक्रेत्यांनाही जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येते.सर्व सेवा एकाच ठिकाणी असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळण्यासाठी होतो. 
13 / 15
शीतगृहे, गोदाम मालक आणि ग्राहकांसाठी देखील हे उपयुक्त आहे. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येते. 
14 / 15
शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात आणि वेळेत मध्यस्थांखेरीज संस्थात्मक ग्राहकांपर्यंत मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी आधारभूत ठरून नफा वाढेल. 
15 / 15
चांगली मागणी असणाऱ्या बाजारपेठा जोडणे, माल पोहोचवण्यासाठी स्वस्त वाहतूक सेवा उपलब्ध होणे, शेतकऱ्यांचा नफा वाढण्यास हे अ‍ॅप उपयुक्त असणार आहे.