CoronaVirus Marathi News corona india covid surge 66 thousand cases 1008 death
CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 4:40 PM1 / 16जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 16संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. 3 / 16कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारताने ब्राझील आणि रशियालाही मागे टाकले आहे. यामध्ये जगात भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. 4 / 16देशातील दहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. 5 / 16देशातील रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 24,61,191 वर गेला आहे. 6 / 16केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (14 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 64,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1007 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 / 16कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 48 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,61,595 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 17,51,556 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 8 / 16जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, भारत कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. 9 / 16कोरोनाच्या क्रमावारीत याआधी ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता भारताने आता त्याला मागे टाकले आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे.10 / 16कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा सातत्याने वाढत आहे. 11 / 16महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत अनेकांना आला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 12 / 16महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा या राज्यात कोरोनाने कहर केला असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 13 / 16मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 14 / 16कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 15 / 16कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 21,100,842 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.16 / 16कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत तब्बल 758,012 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 13,949,117 लोकांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं असून ते बरे झाल्याची माहिती मिळत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications