CoronaVirus News : चिंताजनक! "2021च्या आधी Corona Vaccine शक्य नाही" By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 8:42 AM
1 / 14 देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास आठ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर दुसरीकडे काही दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. 2 / 14 देशातील कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 62.42 टक्के झाले आहे. आतापर्यंत 4 लाख 95 हजारांवर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 2 लाख 76 हजार 882 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 3 / 14 दररोज सरासरी 400 रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत असली तरी नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 4 / 14 दररोज सरासरी 400 रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत असली तरी नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 5 / 14 भारतातही 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील कोवॅक्सीन लाँच करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र याबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 6 / 14 कोरोनाची लस 2021 आधी उपलब्ध करून देणं कठीण असल्याची माहिती मिळत आहे. ही लस सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी 2021 हे वर्ष येईल असं म्हटलं जात आहे. संसदीय समितीत याबाबत माहिती देण्यात आली आहे. 7 / 14 विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षी कोरोनाची लस तयार करून ती सर्वत्र उपलब्ध करणं शक्य नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2 8 / 14 2021च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होऊ शकेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत या संदर्भात खुलासा करण्यात आला. 9 / 14 कोरोना आणि इतर साथीच्या आजारांशी भविष्यातील व्यवहार करण्याची तयारी या बैठकीचा अजेंडा होता. कोरोनाच्या संकटात काही महिन्यानंतर शुक्रवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. 10 / 14 भारतात सुरू असलेल्या कोरोनाच्या लसीच्या निर्मितीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन नावाची कोरोनाची लस येऊ शकते असं सांगण्यात येत आहे. 11 / 14 लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती. 7 जुलैला मानवी चाचणी करण्यात आली. त्यामुळे ही लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होते का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 12 / 14 भारतात एका दिवसात 26 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. वैद्यकीय तपासण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 13 / 14 दिवसागणिक मृत्यूसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 400 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे बळी जात आहे. 14 / 14 दिवसागणिक मृत्यूसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 400 हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे बळी जात आहे. आणखी वाचा