शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोना हृदय आणि फुफ्फुसांवर करतोय 'अटॅक', रक्ताच्या होताहेत गुठळ्या; रिपोर्टमधून खुलासा

By सायली शिर्के | Published: November 14, 2020 3:19 PM

1 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 14
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 87,73,479 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,29,188 लोकांचा मृत्यू झाला आहे.
3 / 14
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44,684 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 520 जणांचा मृत्यू झाला. देशात लॉकडाऊन सुरू असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
4 / 14
कोरोना संदर्भात अनेक ठिकाणी संशोधन केलं जात असून नवनवीन माहिती समोर आली आहे. नव्या रिपोर्टने लोकांची चिंता वाढवली आहे. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 / 14
कोरोना व्हायरस हा हृदय आणि फुफ्फुसांवर अटॅक करत असून रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिपोर्टमधून हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
6 / 14
हरियाणा आरोग्य विभागाच्या डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली असून गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
7 / 14
कोरोना व्हायरस हा फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवत आहे. यामुळे अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच रुग्णांच्या रक्ताच्या गुठल्या होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
8 / 14
हरियाणामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 2006 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांबाबत डॉक्टरांच्या एका विशेष टीमने डेथ ऑडिट केलं आहे.
9 / 14
डॉ. राजेंद्र राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'संक्रमित रूग्णांच्या छातीत हा संसर्ग दिसल्यानंतर त्यांचं सीटीस्कॅन करण्यात आलं. 50 ते 75 टक्क्यांपर्यंत फुफ्फुसांमध्ये हा संसर्ग पसरला असेल तर त्यातून रुग्णाचे प्राण वाचवणं शक्य असतं.'
10 / 14
कोरोनामुळे जवळपास 90 टक्क्यांहून अधिक फुफ्फुसांचं नुकसान झालं असेल तर ते अधिक आव्हानात्मक काम असतं. अशा रुग्णांना वाचवता येत नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे.
12 / 14
कोरोना व्हायरसवर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या शरीरातील अँटीबॉडीज लवकर कमी होत असल्यामुळे या रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका आहे.
13 / 14
ब्रिटीश संशोधकाने हा दावा केला आहे. अँटीबॉडीज लवकरच कमी होत असल्यामुळे दीर्घकाळापर्यंत रोगप्रतिकार क्षमता असण्याची आशाही संपुष्टात येत आहे. कोरोनाच्या आजारावर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा लागण होत नाही असं म्हटलं जात होतं.
14 / 14
लंडनमधील इम्पिरिअल कॉलेजच्या एका संशोधनात पुन्हा रुग्णांना कोरोनाची लागण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संशोधनात इंग्लंडमध्ये 3,65,000 हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतResearchसंशोधनhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर