CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 11:39 IST
1 / 17देशात कोरोनाचा उद्रेक होत असून दिवसागणिक धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. 2 / 17कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 20 लाखांच्या वर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 3 / 17चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णांची संख्या 20,88,612 वर पोहोचली आहे. 4 / 17केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (8 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61,537 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 933 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 / 17देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 42,518 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,19,088 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 14,27,006 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 6 / 17देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी अनेक ठिकाणी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. 7 / 17जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आलं आहे. देशात लस कधी उपलब्ध होणार, त्याची किंमत किती असणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे. 8 / 17कोरोना लस कधी उपलब्ध होणार आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ती कशी पोहोचणार यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाच्या बैठका होत आहेत.9 / 17कोरोनावरची लस भारतात उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ही लस नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकार योजना तयार करत आहे. 10 / 17इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखण्याचं काम सुरू आहे. याशिवाय वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विविध संस्थांचे अधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. 11 / 17कोरोनावरील लस कशी प्रत्येक भागात आणि घरात पोहोचवता येईल यासंदर्भात विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. सरकारने यासाठी दोन समिती स्थापन केल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.12 / 17पहिल्या समितीमध्ये पंतप्रधान आणि वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर के. विजयराघवन आहेत. भारतात आणि जगभरात होणाऱ्या लशीच्या चाचण्यांवर त्यांचं लक्ष आहे.13 / 17दुसऱ्या समितीचे अध्यक्ष हे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल आहेत. या समितीमध्ये आरोग्य, वाणिज्य, परराष्ट्र मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय सचिव आहेत. तसेच अनेक मोठे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स आहेत.14 / 17लस तयार झाल्यानंतर लोकांना लस कशी उपलब्ध करून द्यावी याबाबत काम सुरू आहे. कोणत्या प्रकारचे कोल्ड स्टोरेज ठेवले पाहिजे याचा विचार केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 15 / 17संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा पार केला आहे.16 / 17जगभरात कोरोनचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. 17 / 17वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 724,081 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 19,545,326 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.