शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 8:31 AM

1 / 15
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जून महिन्यात दररोज 8 ते 10 हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
2 / 15
जवळपास दोन महिने लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे गेली आहे.
3 / 15
कोरोना मृतांचा आकडा साडे सात हजारांहून अधिक आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयानं कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे. देशात आतापर्यंत 50 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
4 / 15
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच काळजी वाढवणारा एक रिसर्च समोर आला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि हवामानातील बदल यांच्या कनेक्शनबाबत एक नवी माहिती रिसर्चमधून पुढे आली आहे.
5 / 15
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदल यांचा अभ्यास केला. यामध्ये आर्द्रता वाढल्यास कोरोना जास्त काळ वातावरणात राहू शकतो असं म्हटलं आहे.
6 / 15
आयआयटीने केलेल्या रिसर्चमध्ये पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याची शक्यता असल्याचं देखील नोंदवण्यात आलं आहे.
7 / 15
आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी कोरोना व्हायरसवर अभ्यास केला आहे. दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या शिंकेतून निघणाऱ्या ड्रॉपलेटचा अभ्यास केला.
8 / 15
ड्रॉपलेटच्या कोरड्या होण्याच्या गतीची आणि जगातील 6 शहरांमध्ये दररोज होणाऱ्या संसर्गाची तुलना केली.
9 / 15
रजनीश भारद्वाज यांनी कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता क्षेत्रात विषाणूचा अस्तित्व दर 5 पट जास्त असल्याची माहिती दिली आहे.
10 / 15
मुंबईत लवकरच मान्सून धडकणार आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका अधिक आहे.
11 / 15
पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त वेगाने वाढू शकतो.
12 / 15
प्राध्यापक अमित अग्रवाल यांनी जर आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त काळ टिकून राहिला तर मुंबई, केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांत येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होईल.
13 / 15
आयआयटीच्या प्राध्यापकांनी केलेल्या या अभ्यासाशी अनेक डॉक्‍टर्स सहमत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.
14 / 15
भारताने कोरोना चाचण्यांमधील 50 लाखांचा टप्पा पार केला. भारताआधी तीन देशांनी 50 लाख चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटनचा समावेश आहे.
15 / 15
अमेरिकेने 2.18 कोटी, रशियानं 1.13 कोटी, तर ब्रिटननं 59 लाख चाचण्या घेतल्या आहेत. चाचण्यांचा आकडा पाहिल्यास भारत ब्रिटनच्या जवळ आहे. मात्र अमेरिका, रशियाच्या खूप मागे आहे.