CoronaVirus Marathi News covid 19 will under control diwali says dr harshvardhan
CoronaVirus News : कोरोनावर कधी नियंत्रण मिळवता येणार?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 8:33 AM1 / 16देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी ही सातत्याने समोर येत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मात्र याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर येत आहे. 3 / 16जगभरात कोरोनावरील औषध आणि लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर अनेक ठिकाणी चाचण्या यशस्वी झाल्या असून संशोधनाला यश येत आहे. 4 / 16देशात दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना बरे होण्याऱ्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. 5 / 16कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण दिसत आहे. कोरोना व्हायरस संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.6 / 16कोरोनावर कधीपर्यंत नियंत्रण मिळवता येईल आणि कोरोना लस कधी उपलब्ध होईल, कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल याबाबत हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे. 7 / 16दिवाळीपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाला मोठं यश मिळेल अशी आशा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. 8 / 16कोरोनाचा संसर्ग हा पुढच्या काही महिन्यांत नियंत्रणात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच 2020च्या अखेरीस कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी आशा असल्याचं देखील म्हटलं आहे. 9 / 16कोरोनाने आपल्याला एक गोष्ट शिकवली. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणला. आरोग्याबाबत अधिक सतर्क आणि सावध राहायला हवं. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती हर्षवर्धन दिली.10 / 16देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येने 35 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर 60 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 11 / 16देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 16देशातील कोरोनाग्रस्तांपैकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. 13 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या सात दिवसांमध्ये 4,96,070 नवे रुग्ण आढळले आहेत. 14 / 16जगभरात सात दिवसांत असलेल्या रुग्णसंख्येत भारतातील संख्या ही सर्वाधिक आहे. कोरोनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 15 / 16देशामध्ये हरियाणा, दिल्ली, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. 16 / 16जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications