CoronaVirus Marathi News covid19 asymptomatic patients have high virus load
CoronaVirus News : चिंता वाढली! लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 8:34 AM1 / 15कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. 2 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहे. मात्र असं असताना देखील रिसर्चमधून धक्कादायक माहिती तसेच धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. 3 / 15अनेकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. मात्र लक्षणं नसलेले देखील रुग्ण आढळत आहेत. 4 / 15कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. 5 / 15लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच या कोरोनाग्रस्तांच्या शरीरात व्हायरसचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे. 6 / 15काही कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणं दिसतात तर काहींमध्ये लक्षणं दिसत नाहीत. मात्र आता लक्षणं असलेल्या रुग्णांच्या तुलनेत लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या शरीरात व्हायरसचं प्रमाण जास्त असल्याचं रिसर्चमधून समोर आली आहे.7 / 15तेलंगणातील 200 हून अधिक कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या रिसर्चमधून कोरोना व्हायरसशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. 8 / 15हैदराबादच्या सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स (CDFD) च्या शास्त्रज्ञांनी आणि इतरही संशोधकांनी मिळून हा रिसर्च केला आहे. 9 / 15लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या प्राथमिक आणि द्वितीय संपर्काची माहिती मिळून त्यांची तपासणी करून त्यांना देखरेखीत ठेवलं. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने संशोधन करण्यात आले आहे. 10 / 15सीडीएफडीच्या लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर ऑन्कोलॉजीचे (Laboratory of Molecular Oncology) मुरली धरण बश्याम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आह, 11 / 15लक्षण नसलेल्या रुग्णांपासून संक्रमणाची शक्यता किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्यांच्यामार्फत रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असलेल्यांना संक्रमण झालं तर मृत्यूदर वाढण्याचा धोका अधिक असतो असं म्हटलं आहे.12 / 15रोगप्रतिकारक प्रणालीचे तज्ज्ञ सत्यजीत रथ यांनी देखील लक्षणं न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त असून हे हैराण करणारं असल्याचं म्हटलं आहे.13 / 15लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत सीटी मूल्य अधिक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये व्हायरस प्रमाण कमी असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 15देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. रुग्णांचा आकडा हा तब्बल 36,91,167 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 65,288 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.15 / 15जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications