CoronaVirus Marathi News COVID19 recoveries crosses 10 lakh mark India
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 8:34 AM1 / 16जगभरातील सर्व देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. 2 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीदेखील सातत्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जगभरात तब्बल एक कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 / 16कोरोनामुळे आतापर्यंत सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.4 / 16भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांहून अधिक झाली आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.5 / 16देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. देशात तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. 6 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 7 / 16भारतात आतापर्यंत 10,21,611 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.8 / 16भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. तसेच बरं होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. 9 / 16देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 15,84,384 वर गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात 35,003 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.10 / 16जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे.11 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे. 12 / 16देशात कोरोनाचा वेग वाढला असून चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. फक्त 12 दिवसांत कोरोनाचे तब्बल 5 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत.13 / 16ब्लूमबर्ग कोरोना व्हायरस ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी 20 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने 15 लाखांचा टप्पा पार केला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 14 / 16भारतात जानेवारीमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 148 दिवस लागले. मात्र त्यानंतर कमी दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 15 / 16कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 16 / 1610,231,837 जणांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. जगभरातील एकूण रुग्णांची संख्या 16,917,714 आहे. तर 663,942 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications