शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : हवेतूनही होतो कोरोनाचा प्रसार; मास्कबाबत तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 9:23 AM

1 / 14
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक त्याचा धोका हा सातत्याने वाढत आहे. जगभरात आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 14
कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्ब्ल सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावावा लागला आहे तर अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
3 / 14
कोरोना व्हायरसबाबत संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना केल्या जात असून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
4 / 14
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रसार हा हवेतूनही होऊ शकतो याला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) दुजोरा देण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
5 / 14
'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे'कडून (CSIR) नागरिकांना बंद जागेवरही मास्क परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मास्कबाबत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
6 / 14
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकल्यातून निघणारे ड्रॉपलेट्स दीर्घकाळापर्यंत हवेत राहतात. यामुळे इतरांना संक्रमणाचा धोका असतो.
7 / 14
CSIR चे अध्यक्ष शेखर सी मांडे यांनी एक ब्लॉगमधून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. वेगवेगळ्या संशोधनाचा उल्लेख करताना त्यांनी कोरोनाचा हवेतून प्रसार होऊ शकतो असं म्हटलं आहे.
8 / 14
कोरोना संकटात स्वत:ला सुरक्षित कसं ठेवू शकतो? यावर मांडे यांनी 'उत्तर सोप्पं आहे. गर्दीपासून लांब राहा, काम करण्याची जागा मोकळी असायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंद जागेवरही मास्कचा वापर करा' असं सांगितलं आहे.
9 / 14
जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून 32 देशांच्या 239 संशोधकांनी कोविड 19 चा हवेतून प्रसार होत असल्याची सूचना केली होती. मास्क परिधान करणं हीच कोरोनाविरुद्धची सर्वात महत्त्वाची रणनीती ठरू शकते असं मांडे यांनी म्हटलं आहे.
10 / 14
खोकल्यातून किंवा शिंकेतून निघालेले ड्रॉपलेट्स जमिनीवर पडतात. मात्र छोटे ड्रॉपलेट्स हे हवेत तरंगत असतात. हवेतून कोरोना पसरण्याचा धोका असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
घराबाहेर पडताना एन-95 मास्कचा लोकांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, त्यामुळे या मास्कची मागणीही वाढली आहे. मात्र आता या एन-95 मास्कच्या वापराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
12 / 14
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्याच्याबाबतीत निरुपयोगी असल्याचे म्हटलं आहे. तसेच याबाबत विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यांना पत्र लिहून वापराबाबत सूचना केली आहे.
13 / 14
आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक राजीव गर्ग यांनी याबाबतचे पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून व्हॉल्व्ड रेस्पिरेटर लावलेल्या मास्कबाबत इशारा देण्यात आला आहे.
14 / 14
अशा प्रकारचा मास्क कोरोनाचा फैलाव रोखू शकत नाही. तसेच ही बाब कोविड-19 ला रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या विपरित आहे, असे या पत्रात म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत