CoronaVirus Marathi News dcgi approves favipiravir for covid19 treatment
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 8:41 AM1 / 15जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल चार लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.2 / 1584 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे.3 / 15भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. तर 12000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत.4 / 15कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.5 / 15कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.6 / 15कोरोनाच्या संकटात आता एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. फेवीपिरवीर (Favipiravir) हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जाणार आहे.7 / 15भारतातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोविड-19 च्या उपचारासाठी फेवीपिरवीर (Antiviral drug Favipiravir) चा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.8 / 15आपात्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जाईल आणि त्यासाठीदेखील रुग्णाच्या नातेवाईकांची परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं डीसीजीआयने स्पष्ट केलं आहे.9 / 15हे औषध 14 दिवस दिलं जावं. सुरुवातीला 1 हजार रुग्णांवर या औषधाचे काय परिणाम होतात ते तपासले जावेत, असं ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने सांगितलं आहे. 10 / 15औषध उत्पादित करणारी ग्लेनमार्क कंपनी भारतात 10 प्रमुख सरकारी आणि खासगी रुग्णालयातील 150 रुग्णांवर फेविपिरवीर औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.11 / 15फेवीपिरवीर औषधाचा वापर जपान, चीन आणि इतर काही देशांमध्ये इन्फ्लुएंजावरील उपचारासाठी होतो. सीएसआयआर एका देशी जडी-बुटीला जैविक औषध अथवा फायटोफार्मास्यूटिकलच्या रूपात विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. 12 / 15डेंग्यूवरील उपचारात याचा वापर होत आहे. आता यात कोविड-19 सोबत लढण्याची क्षमता आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना संक्रमणातही हे औषध फायदेशीर ठरू शकतं, असं दिसून आलं.13 / 15चीनमध्ये कोरोनाग्रस्तांना प्रायोगिक तत्वावर हे औषध देण्यात आलं. इतर औषधांच्या तुलनेत हे औषध व्हायरल झपाट्याने कमी करतं असं दिसून आलं आहे. 14 / 15कोरोना रुग्णांचं सीटी स्कॅन करण्यात आलं तर त्यामध्ये चांगली सुधारणा दिसून आली. मात्र काही रुग्णांमध्ये या औषधाचे साईड इफेक्टसही दिसून आले आहेत. 15 / 15कोरोनावरील उपचारात फेवीपिरवीर यशस्वी ठरलं तर लवकरच हे स्वस्त ओषध उपलब्ध होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications