CoronaVirus Marathi News death corona world now india average 1100 deaths daily
CoronaVirus News : बापरे! देशात दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू, कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ By सायली शिर्के | Published: October 02, 2020 2:54 PM1 / 12जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 2 / 12जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. 3 / 12देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 63,94,069 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 99,773 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 4 / 12देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 81,484 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,095 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 5 / 12देशात दररोज सरासरी 1100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि ब्राझीलमधील आकडे कमी होताना दिसत आहेत. 6 / 12अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज सरासरी 800 रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. जगभरात 3 कोटी 44 लाख 81 हजार 663 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 7 / 12कोरोनामुळे जगभरातील 10 लाख 27 हजार 653 लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत 2 लाख 12 हजार 660 लोकांचा तर ब्राझीलमध्ये 1 लाख 44 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 8 / 12देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहेत. मात्र याचवेळी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे. येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा हा एक लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे. 9 / 12जगभरात गेल्या 24 तासांत 8,826 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृतांच्या संख्येत देखीव वाढ होत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 10 / 12महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14 लाखांवर गेली असून 16,476 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे सात लाखांहून अधिक रुग्ण आहेत. 11 / 12कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये देखील रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 12देशात लॉकडाऊन सुरू असून मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच अनेकांवर उपचार सुरू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications