CoronaVirus Marathi News fatal syndrome misc reported children corona cases
CoronaVirus News : बापरे! चिमुकल्यांमध्ये दिसला कोरोनाचा जीवघेणा सिंड्रोम MIS-C, जाणून घ्या लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 9:52 AM1 / 15जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.2 / 15कोरोनाच्या या महाभयंकर संकटात लहान मुलांची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. चिमुकल्यांना देखील कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. याच संदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 3 / 15कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित एक जीवघेणा सिंड्रोम म्हणजेच लक्षणं दिसून आली आहेत. 4 / 15चिमुकल्यांमध्ये याआधी कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत होती. तसेच मुलांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणारे मृत्यूही खूप कमी होते. त्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. 5 / 15स्वीडन, अमेरिका, स्पेन आणि ब्रिटननंतर आता भारतीय मुलांमध्ये एक जीवघेणा मल्टीसिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम दिसून येत आहे. याला MIS-C असंही म्हटलं जातं.6 / 15आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 22 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये 20 वर्षांच्या खालील मुलांची संख्या केवळ 1.22% होती. अशा परिस्थितीत अजूनही MIS-C भारतात मर्यादित आहे.7 / 15MIS-C मध्ये रुग्णाला कावासाकीसारखी लक्षणं आढळतात, यात मुलांना ताप, शरीराच्या अवयवांचे काम थांबणे, अवयवांमध्ये जास्त सूज येणे यासारख्या समस्या आहेत. 8 / 15जर्नल सेलमधील संशोधनानुसार, स्वीडन आणि इटलीमधील संशोधकांनी निरोगी मुलांमध्ये रोगप्रतिकारक पेशी, साइटोकिन्स आणि ऑटो-अँटीबॉडीजच्या यंत्रणेचे विश्लेषण केले आहे.9 / 15कोरोनाच्या आधी कावासाकी आजाराने ग्रासलेली मुलं, कोरोना असलेली मुलं आणि MIS-C असलेल्या मुलांना मल्टिपल ऑटोअँटीबॉडीजमुळे MIS-C पसरल्याचे आढळले. 10 / 15संशोधनात ताप, डोळे येणे, पाय सूज येणे, घशात सूज येणे या गोष्टी आढळल्या आहेत. तर, MIS-C मध्ये डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, घसा खवखवणे आणि खोकला येणे ही लक्षणं आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना आरोग्य तज्ज्ञांनी मात्र पालकांना लहान मुलांना मास्क घालण्यासंबंधी सल्ला दिला आहे.12 / 15जागतिक आरोग्य संघटनेने चिमुकल्यांच्या मास्कबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. WHO च्या नव्या सूचनांनुसार, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही प्रौढांसारखे मास्क घालणे महत्त्वाचे आहे.13 / 15संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत असं म्हटलं आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे मास्क महत्त्वाचा आहे.14 / 15जेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे असं देखील म्हटलं आहे. 15 / 15WHOच्या मते 12 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले प्रौढांप्रमाणे कोरोना पसरवू शकतात. तर 5 वर्षांखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही असं सांगितलं आहे. 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांनी मास्कचा वापर करावा. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालणे गरजेचा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications