शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय, बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय

By सायली शिर्के | Published: October 06, 2020 3:30 PM

1 / 15
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 15
देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा 66 लाखांवर गेला असून एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
3 / 15
मंगळवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61,267 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 884 जणांचा मृत्यू झाला आहे.
4 / 15
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 66 लाख 49 हजारांवर पोहोचली. तर आतापर्यंत 1 लाख 3 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 75 हजार 675 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
5 / 15
गेल्या 26 दिवसांत, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 10.17 लाखांवरून ती 9.19 लाखांवर पोहोचली आहे. देशात सध्या 9 लाख 19 हजार 023 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
6 / 15
कोरोनाच्या संकटात आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 56 लाख 62 हजार 491 लोक बरे झाले आहेत.
7 / 15
देशातील अनेक राज्यांत कोरोनाचा वेग मंदावतो आहे. जवळपास 25 राज्यांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनातून ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.
8 / 15
देशाचा रिकव्हरी रेट हा आता 84.34 टक्के झाला आहे. तर मृत्यू दर हा 1.55 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशांमध्ये भारताचा मृत्यू दर हा सर्वात कमी आहे.
9 / 15
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका दिवशी 10,89,403 नमुन्यांची चाचणी केली जाते. तसेच आतापर्यंत एकूण 8,10,71,797 नमुन्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.
10 / 15
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या सण-समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात मास्क घालूनच सर्व सण साजरे करावेत असा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे.
11 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून विविध उपाय केले जात आहे. अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 15
डब्ल्यूएचओने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगातील प्रत्येक 10 व्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते.
13 / 15
डब्ल्यूएचओच्या या दाव्यावर विश्वास ठेवल्यास, सध्या जगातील कोरोना रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण रुग्णांपेक्षा 20 पट जास्त असू शकते. याशिवाय, भविष्यात कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे.
14 / 15
डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमांचे प्रमुख डॉ. मायकेल रियान म्हणाले, 'ही आकडेवारी गावांपासून शहरापर्यंत वेगवेगळी असू शकते. वेगवेगळ्या वयोगटातील असू शकतात. परंतु याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, जगातील बहुसंख्य लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यात आली आहे.'
15 / 15
कोरोना संक्रमणासंदर्भात आयोजित 34 सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत डॉ. मायकेल रियान म्हणाले, 'महामारीच्या रोगाचा प्रसार अजूनही सुरू आहे. मात्र, संक्रमण रोखण्याचे आणि जीव वाचविण्याचे मार्ग देखील उपलब्ध आहेत.'
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत