CoronaVirus Marathi News government considering 50 lakh doses vaccine first order
CoronaVirus News : कोरोना लसीच्या 50 लाख डोसची ऑर्डर देण्याचा सरकारचा विचार, जाणून घ्या लस पहिली कोणाला देणार? By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 10:14 AM1 / 15देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 29 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा 29,05,824 वर पोहोचला आहे. 2 / 15देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 68,898 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 983 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 54,849 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 3 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच तीन कोरोना लसीची चाचणी देखील सुरू आहे. याच दरम्यान कोरोना लसी संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 4 / 15केंद्र सरकारकडून सुरुवातीला कोरोना लसीचे जवळपास 50 लाख डोस खरेदी करण्याचाही विचार सुरू आहे. केंद्राने लस उपलब्ध करण्याच्या प्राथमिकतेबद्दल मंथन सुरू केलं आहे. 5 / 15लस तयार झाल्यानंतर सुरुवातीला ती कोरोनाविरुद्धचच्या लढ्यात सेवा करणारे आरोग्य कर्मचारी, सेनेचे जवान आणि काही विशिष्ट श्रेणीतील लोकांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. 6 / 15सरकारने मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीचं वितरण केलं तर लवकरच मोठी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकापर्यंत ही लस पोहचू शकेल याचा विचार करत आहे. त्यासाठी वितरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 7 / 15सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लस निर्मात्यांनी सरकारकडे एका निश्चित मागणीचं अनुमान मागितलं आहे. त्यामुळे लस तयार झाल्यानंतर काही आठवड्यांच्या आत लसीचं उत्पादन केलं जाईल. 8 / 15कंपन्यांना लशीच्या मागणीबद्दल आश्वस्त करण्यात आलं आहे. कोरोनाची एक लस या वर्षीच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला तयार होऊ शकते असं म्हटलं जातं आहे. 9 / 15मोठ्या लस निर्मात्यांसोबत बैठकीदरम्यान नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने कंपन्यांना आपले प्रस्ताव देण्याची विनंती केली. यामध्ये लशीच्या उत्पादन क्षमतेची माहिती, किंमत आणि सरकार कशी मदत करू शकेल याबद्दल सूचना देण्यास सांगण्यात आलं आहे. 10 / 15तज्ज्ञांच्या या समितीचे अध्यक्ष नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. 11 / 15एका स्थानिक लस निर्माता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लस निर्माणासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते. तसंच मोठ्या प्रमाणात लस उत्पादन करण्यासाठीही आम्हाला आमची क्षमता वापरावी लागेल. 12 / 15ही चर्चा सुरुवातीच्या टप्प्यात असून अद्याप समिती कोणत्याही निर्णयावर पोहचलेली नाही. लस तयार होण्यापूर्वी समितीच्या आणखी काही महत्त्वाच्या बैठकी होण्याची शक्यता आहे.13 / 15देशात सध्या तीन लसींची मानवी चाचणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 15सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच अनेकांनी कोरोनावर मात देखील केली आहे. 15 / 15जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत सात लाखांहून अधिक लोकांना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications