CoronaVirus Marathi News government likely to replace tokens with smartcards for metro SSS
CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:34 PM1 / 14जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 14भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 3 / 14भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33,000 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला 4 / 14प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आली. 5 / 14कोरोनामुळे केंद्र सरकारने देशात मेट्रो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहेत. 6 / 14मेट्रोने प्रवास करताना देखील काळजी घेणं गरजेचं असणार आहे. मेट्रोने प्रवास करताना काय बदल होऊ शकतात हे जाणून घेऊया.7 / 14लॉकडाऊननंतर मेट्रो सेवेत महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात. तसेच मेट्रो गाड्याच सुरू झाल्यावर सरकार टोकनचा प्रवास थांबवू शकतं. 8 / 14फक्त कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवासास परवानगी दिली जाऊ शकते. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे.9 / 14केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय लॉकडाऊननंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करण्यात व्यस्त आहे.10 / 14कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सोशल डिस्टंसिंग पाळून मेट्रो सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.11 / 14मेट्रो स्थानकांवरील दोन प्रवाशांमधील अंतर, त्यांची तपासणी आणि गर्दी नियंत्रण यांचा उपायांमध्ये समावेश आहे.12 / 14स्मार्ट कार्ड रीचार्ज केले जाऊ शकते. मात्र टोकन पॅसेंजरला प्रवास सुरू करताना प्रत्येक वेळी खरेदी करावे लागते. 13 / 14टोकनसाठी मेट्रो स्थानकांच्या काऊंटरवर लांबच लांब रांगा लागतात. ही गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येऊ शकतो.14 / 14रेल्वे प्रशासनाने प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. पण पॅसेंजर, एक्स्प्रेस यांपासून उपनगरी गाड्या तसेच मेट्रो रेल्वेही आता बंद आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications