CoronaVirus Marathi News icmr approves antigen testing kits corona testing
CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 3:31 PM1 / 12देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 332424 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात 9520 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.2 / 12गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 11,502 नवे रुग्ण आढळून आले असून 325 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. 3 / 12कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार आहे. 4 / 12कोरोनाची लक्षणं आढळल्यास चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र रिपोर्ट यायला बराच वेळ लागतो. आता काळजी करण्याची गरज नाही कारण 30 मिनिटांत त्याबाबत माहिती मिळणार आहे. 5 / 12इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्च (ICMR) ने अँटिजेन टेस्टिंग किट्सला मंजुरी दिली आहे. ज्याच्यामदतीने केवळ अर्ध्या तासाच रिझल्ट मिळणार आहे. 6 / 12कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट केली जात होती. ज्या चाचणीचा रिपोर्ट यायला खूप वेळ लागत होता. मात्र आता कोरोनाची चाचणी करण्यासाठी अँटिजेन टेस्ट किट वापरलं जाणार आहे. 7 / 12अँटिजेन टेस्टमध्ये जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 8 / 1230 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार असल्याने रुग्णांवर लवकरात लवकर योग्य ते उपचार करणं देखील सोपं होणार आहे. याचा फायदा होणार आहे. 9 / 12कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना ICMR ने याबाबत माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 10 / 12केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संशयित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 11 / 12कुटुंबाकडे रुग्णाचा मृतदेह देण्याआधी रिपोर्टची गरज लागणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. रविवारी मंत्रालयाने दिल्ली सरकारला पत्र लिहिले आहे. 12 / 12कोविड-19 मुळे संशयित रुग्णांच्या लॅब रिपोर्टची वाट न पाहता मृतदेह हा कुटूंबाकडे सोपवावा, मात्र अंत्यसंस्कार हे सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येतील असं सांगितलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications