शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 8:29 AM

1 / 15
देशामध्ये कोरोना साथीने माजविलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे नाहीत. या आजाराने एका दिवसात 294 जणांचा बळी घेतला. याआधी देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण मरण पावले नव्हते.
2 / 15
कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 36 हजारांहून अधिक झाली आहे. या साथीमध्ये आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 6 हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
3 / 15
देशात 1 लाख 15 हजार 942 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 14 हजार 72 रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांत भारतामध्ये कोरोनाचे 9 हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.
4 / 15
कोरोनावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचे प्रयत्न हे केले जात आहे. अनेक ठिकाणी संशोधन केले जात आहे.
5 / 15
कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील संशोधकांनी कोरोनावर एक खास किट विकसित केलं आहे.
6 / 15
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबादच्या संशोधकांनी असा कोरोना चाचणीसाठी एक किट विकसित केलं आहे. या किटच्या मदतीने अवघ्या 20 मिनिटांत रिझल्ट मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
7 / 15
आयआयटी हैदराबादने विकसित केलेले कोविड -19 टेस्टिंग किट सध्या वापरल्या जाणार्‍या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनवर आधारित नाही.
8 / 15
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे किट 550 रुपये किंमत लक्षात ठेवून विकसित केले गेले आहे. मात्र मोठ्या संख्येने उत्पादन केल्यास याची किंमत 350 रुपयांपर्यंत असू शकते.
9 / 15
हैदराबादच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात चाचणी किटच्या पेटंटसाठी संशोधकांनी अर्ज केला आहे आणि क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे परवानगी मागण्यात आली आहे.
10 / 15
आयआयटी हैदराबाद येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी आम्ही कोरोना चाचणी किट विकसित केली आहे, जी 20 मिनिटांत लक्षणं असलेल्या व नसलेल्या रुग्णांच्या चाचणी अहवाल देईल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते आरटी-पीसीआरसारखे कार्य करते असं म्हटलं आहे.
11 / 15
'कमी किंमतीची ही चाचणी किट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेली जाऊ शकते आणि रुग्णाच्या घरी त्याची चाचणी केली जाऊ शकते.'
12 / 15
सध्याच्या चाचणी प्रणालीचा पर्याय म्हणून ही चाचणी किट वापरली जाऊ शकते. आम्ही कोविड-19 जीनोमच्या संरक्षित प्रदेशांचा विशिष्ट क्रम शोधला आहे असं देखील प्राध्यापकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 15
भारतामध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनामुळे दररोज सरासरी 239 जणांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवडाभरात देशात कोरोनामुळे दररोज सरासरी 179 जणांचा मृत्यू झाला होता.
14 / 15
सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 28 हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये 19 हजारांहून अधिक रुग्ण आहेत.
15 / 15
सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 28 हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये 19 हजारांहून अधिक रुग्ण आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल