CoronaVirus Marathi News india good news on recovery testing death rate
CoronaVirus News : आनंदाचा 'चौकार'! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, 'या' गोष्टींमुळे देशाला मोठा दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:35 PM1 / 16देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 27,02,743 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 51,797 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 2 / 16देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,079 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 876 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. 3 / 16कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिलासादायक माहितीही समोर येत आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 4 / 16अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे. देशाने आनंदाचा चौकार लगावला आहे. 5 / 16देशात चाचण्यांचं वाढवण्यात आलेलं प्रमाण आणि आयसोलेशन यामुळे रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच कोरोनातून ठिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. 6 / 16कोरोनाग्रस्तांवर देशातील अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यू दरात सातत्याने घट होत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 7 / 16कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील परिस्थिती आता सुधारते आहे. 8 / 16देशात कोरोनाचा मृत्यू दर 1.92 टक्के आहे. तसेच जगातील सर्वात कमी मृत्यू दर असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. 9 / 16तब्बल 19,77,779 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर त्यांनी कोरोनाचं युद्ध जिंकलं आहे. देशाचा रिकव्हरी रेट 73 टक्क्यांवर गेला आहे. 10 / 16दिल्लीचा रिकव्हरी रेट हा सर्वात जास्त आहे. तर महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा रिकव्हरी रेट हा इतर राज्यांच्या तुलनेत थोडा कमी आहे. 11 / 16कोरोना चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 8.97 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. 12 / 16भारतात कोरोनाच्या चाचण्यांच्या संख्येने नवा रेकॉर्ड केला आहे. सुरुवातीला कमी चाचण्या केल्या जात होत्या. मात्र आता त्यामध्ये वाढ झाली आहे.13 / 16देशात कोविड टेस्टिंग लॅबची संख्या देखील वाढत आहे. आतापर्यंत देशात तब्बल 3,0941,264 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 14 / 16देशात कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच गेल्या 24 तासांत तो 8.81% होता. 15 / 16सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन, मास्कच्या मदतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईने याबाबतचे वृत्त दिले आहे.16 / 16जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications