CoronaVirus Marathi News india recruit 1500 patients hossolidarity trial corona SSS
CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! 1500 भारतीयांवर WHO 'या' औषधांची चाचणी करणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 1:31 PM1 / 15जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा अडीच लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. 2 / 15कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. 3 / 15भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 78 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 2400 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय घेतले जात आहेत. 4 / 15कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. 5 / 15कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. 6 / 15कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही. 7 / 15जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याच दरम्यान काही औषधांचे ट्रायल (चाचणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून कोणतं औषध हे कोरोनावर प्रभावी ठरतं याची माहिती मिळणार आहे. 8 / 15हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, WHOच्या या ट्रायलमध्ये 1500 भारतीय कोरोनाग्रस्तांचा समावेश असणार आहेत. तसेच यामध्ये जगभरातील 100 देशांच्या रुग्णांचा देखील समावेश आहे. 9 / 15इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ट्रायलसाठी रुग्णांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत देशातील 9 रुग्णालयांची यासाठी निवड करण्यात आली आहे.10 / 15ट्रायल दरम्यान रुग्णांना अँटी-व्हायरल औषधं दिली जातील. यामध्ये रेमेडीसवीर, क्लोरोक्विन / हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपीनावीर-रीटोनाविर या औषधांचा समावेश असणार आहे.11 / 15कोणत्याही औषधाचा कोरोनाच्या रूग्णांवर अधिक परिणाम होत आहे की नाही याची माहिती ही चाचणीतून मिळणार आहे. 12 / 15जोधपूरमधील एम्स, चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल, अहमदाबाद बीजे मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि भोपाळमधील चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. 13 / 15ICMR-नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (NARI) डॉक्टर शीला गोडबोले यांनी सध्या आम्ही आकडेवारीचे पालन करीत आहोत, त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण जास्त आहेत, तेथे चाचणी साइट्स असतील असं म्हटलं आहे.14 / 159 रुग्णालयांना यासाठी देण्यात आली आहे. लवकरच आणखी 4 रुग्णालयांना ग्रीन सिग्नल देण्यात येईल अशी माहिती गोडबोले यांनी दिली आहे.15 / 15रुग्णांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.आम्ही या प्रोग्राममध्ये आणखी रूग्णांचा समावेश करू शकतो असंही शीला गोडबोले यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications