CoronaVirus Marathi News indias covid19 recoveries cross 15 lakh mark
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा विस्फोट होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 9:33 AM1 / 16जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास दोन कोटींच्या वर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून दिवसागणिक गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. 3 / 16भारतातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला असून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. 4 / 16देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकूण रुग्णांची संख्या ही 22,15,075 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 5 / 16एका दिवसात कोरोनाचे तब्बल 62,064 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,007 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 44,386 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.6 / 16देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.7 / 16कोरोनाबाबतची सुखावणारी माहिती समोर आली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दररोज वाढत आहे. अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून व्हायरसवर मात केली आहे. 8 / 16देशात आतापर्यंत तब्बल 15 लाखांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी दिली आहे.9 / 1610 राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक असून देशातील 80 टक्के रुग्ण या राज्यांमधील असल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.10 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न हे केले जात आहेत. मात्र कोरोनाचा ग्राफ वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णसंख्येने मोठा दिलासा दिला आहे. 11 / 16कोरोनाचा धोका लक्षात घेता देशातील कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. 24 तासांत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. 12 / 16केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात आतापर्यंत 2,416,535 इतक्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती दिली आहे. देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 68.78 टक्के झाले आहे.13 / 16देशातील मृत्यूप्रमाण कमी झाले असून ते 2.01 टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.14 / 16कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.15 / 16जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 20,024,263 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 12,898,238 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.16 / 16जगात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications