CoronaVirus Marathi News India's total cases surge to 82,67,623
CoronaVirus News : कोरोनाचा वेग मंदावतोय! नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा By सायली शिर्के | Published: November 03, 2020 10:28 AM1 / 14जगातील सर्वच देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. 2 / 14जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपली जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून कोरोनावर संशोधन सुरू आहे. 3 / 14काही दिवसांपूर्वी भारतामध्येही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. 4 / 14देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 82 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. 5 / 14गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 38,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 490 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 82,67,623 वर पोहोचली आहे. 6 / 14कोरोनामुळे देशात एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. 7 / 14देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (3 नोव्हेंबर) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,310 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 8 / 14देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 82,67,623 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,23,097 पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. 9 / 14देशातील कोरोनाग्रस्तांपैकी सध्या 5,41,405 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल 76,03,121 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 10 / 14कोरोनावर मात केलल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात 76 लाखांहून अधिक लोकांनी व्हायरसवर मात करून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. 11 / 14उपचारानंतर कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे आता जवळपास 90 टक्के झाले आहे. 12 / 14केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या या आकडेवारीने संकटात मोठा दिलासा दिला आहे. 13 / 14सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा ग्राफ आता 50 टक्क्यांनी खाली घसरला आहे. रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट होत आहे.14 / 14कोरोनाचा संसर्ग तीव्र गतीने होत असताना गेल्या एका आठवड्यापासून 50 टक्के कमी रुग्णवाढ होत आहे.कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.50 टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications