CoronaVirus Marathi News lockdown nobelprize winners demands fund children SSS
CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात... By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 3:25 PM1 / 17जगभरातील अनेक देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 2 / 17लॉकडाऊनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतरही काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.3 / 17कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे. 4 / 17लॉकडाऊननंतर लहान मुलांना अधिक त्रास होऊ शकतो. चिमुकल्यांची सर्वात भयानक अवस्था असेल अशी चिंता नोबेल विजेत्यांनी व्यक्त केली आहे.5 / 1720 देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकांचे गव्हर्नर्स यांच्या जी-20 समूहाकडे लहान मुलांसाठी एक ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. 6 / 17जगभरातील 85 नोबेल विजेते, माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे दोन माजी अध्यक्ष यांनी ही मागणी केली आहे. यामध्ये भारतातर्फे कैलाश सत्यार्थी आणि दलाई लामा यांचा समावेश आहे.7 / 17लॉरिएट्स अँड लीडर्स फॉर चिल्ड्रन्स संस्थेच्या अंतर्गत हे आवाहन करण्यात आलं आहे. लॉकडाऊननंतर विशेषत: लहान मुलांची अवस्था ही जास्त खराब होईल असं मत त्यांन व्यक्त केलं आहे. 8 / 17चाइल्ड ट्रॅफिकिंग (child trafficking) आणि लहान मुलांसंबंधी गुन्हे वाढू शकतात. घरात काम करणाऱ्या मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारातही वाढ होऊ शकते.9 / 17नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी हे बजेट जगातील त्या वंचित वर्गाच्या 20 टक्के मुलांवर खर्च होईल. यामार्फत शिक्षण, पाणी, सॅनिटेशन आणि आरोग्यासारख्या सुविधा पुरवल्या जातील असं म्हटलं आहे. 10 / 17लॉकडाऊन संपल्यानंतर चाइल्ड ट्रॅफिकिंगची सर्वात मोठी समस्या येईल महत्त्वाची आहे. घर, हॉटेल आणि ढाब्यांवर पुन्हा लहान मुलांची संख्या वाढू शकते असं देखील सत्यार्थी यांनी सांगितलं.11 / 17घरात अडकलेल्या मुलांना लैंगिक शोषण आणि घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागू शकतो. मुलांना आपलं शिक्षण मध्येच सोडावं लागू शकतं. 12 / 17परिस्थितीचा फायदा घेऊन छोट्या कारखान्यात बालकामगार वाढवले जातील. रेड लाइट एरियातही मुलांना भीक मागायला लावली जाऊ शकते. 13 / 17मुलांना वापर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधील मोबाईल, लॅपटॉप आणि पर्स चोरण्यासाठी होऊ शकतो. सध्या याचं प्रमाण कमी आहे. मात्र लॉकडाऊननंतर हे वाढू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.14 / 17कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे नियमित सेवांवर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका लहान मुलांना बसू शकतो, असा धोक्याचा इशारा युनिसेफने काही दिवसांपूर्वी दिला होता.15 / 17कोरोना संकटाचा मोठा परिणाम लहान मुलांवर होईल. बालमृत्यूदरात मोठी वाढ होईल. पाच वर्षांखालील मुलांना याचा मोठा फटका बसेल.16 / 17लहान मुलांना आरोग्य सेवा देण्यासाठी 1.6 अब्ज डॉलरच्या मदतीची आवश्यकता असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. 17 / 17'कोरोना संकटामुळे लहान मुलांच्या आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. याबद्दल तत्काळ पावलं न उचलल्यास पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मृत्यूचा धोका वाढेल. पुढील 6 महिने दररोज 6 हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे,' अशी भीती युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेन्रिटा फोरे यांनी बोलून दाखवली. आणखी वाचा Subscribe to Notifications