CoronaVirus News : धोका वाढला! गुजरातमध्ये कोरोनाचा कहर, प्रशासनाच्या चिंतेत भर; 'या' 4 शहरांत नाईट कर्फ्यू By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 3:18 PM
1 / 16 देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,14,09,831 वर पोहाचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,58,856 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 16 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24,492 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय हे केले जात आहेत. 3 / 16 देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुजरामध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 4 / 16 कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्य सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये दिवसाला 800 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 5 / 16 राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 17 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत अहमदाबाद, सूरत, राजकोट आणि वडोदरा या चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. हा नाईट कर्फ्यू रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील. 6 / 16 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या कोर कमिटीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 7 / 16 गुजरातमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही दोन लाखांच्या वर गेली आहे. तर चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काहींनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे, 8 / 16 साधारण वर्षभराने देश पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. कोरोनाची लसही मोठ्याप्रमाणावर दिली जात आहे. 9 / 16 महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील नागपूरसह काही ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पंजाबच्या आठ जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. 10 / 16 राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये देशातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे. 11 / 16 कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. रिसर्चमधून पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. 12 / 16 ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा सर्व जुन्या स्ट्रेनपेक्षा अधिक खतरनाक आहे. रिसर्चनुसार, हा व्हायरस खूपच घातक आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा स्ट्रेन हा कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा 30 ते 100 टक्के अधिक धोकादायक आहे. 13 / 16 युकेच्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला असून याबाबतची आकडेवारी देण्यात आली आहे. ब्रिटन कोरोना स्ट्रेन आढळून आलेल्या 54906 पैकी 227 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 / 16 नव्या स्ट्रेनमुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूचा दर आणि कोरोना व्हायरसमुळे झालेले मृत्यू यांची रिसर्चमध्ये तुलना करण्यात आली असून यामध्ये बरंच अंतर असल्याचं दिसून आलं आहे. तसेच तो अत्यंत धोकादायक आहे. 15 / 16 कोरोना व्हायरसचा ब्रिटिश व्हेरिएंट हा गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आला. त्यानंतर हा नवा स्ट्रेन 100 हून अधिक देशांत पसरला. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. तसेच नव्या कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडमध्ये 23 म्यूटेशन्स पाहायला मिळत आहे. 16 / 16 म्यूटेशन्सची संख्या ही जास्त असल्याने या कोरोना व्हायरसचा प्रसार हा इतरांच्या तुलनेत अधिक वेगाने हेक आहे. नवा कोरोना हा जुन्या व्हायरसपेक्षा 40 ते 70 टक्के अधिक वेगाने पसरत आहे. आणखी वाचा