CoronaVirus Marathi News noida, mumbai healthcare workers confirmed cases reinfection
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:07 AM1 / 16देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 50,20,360 वर पोहोचला आहे.2 / 16देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,123 नवे रुग्ण आढळले असून 1,290 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 82,066 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 3 / 16कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान कोरोनासंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. 4 / 16कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.5 / 16नोएडामधील दोन आणि मुंबईतील चार आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्ली सीएसआईआरच्या इन्स्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (आयजीआयबी) च्या रिसर्चमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.6 / 16आयजीआयबीचे अनुराग अग्रवाल यांनी देशामध्ये रुग्णांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये मुंबईतील चार आणि नोएडातील दोन रुग्णांचा समावेश आहे. 7 / 16कोरोनाची पुन्हा लागण होते का याचा तपास करण्यासाठी आयजीआयबीच्या एका टीमने देशभरातून 16 आरोग्य कर्मचाऱ्यांचे सँपल घेतले असून त्याची चाचणी केली जात आहे. 8 / 16गवर्नमेंट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज, ग्रेटर नोएडाचे डॉ. राकेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील दोन्ही आरोग्य कर्मचारी हे एकमेकांच्या संपर्कात आले होते. 9 / 16एका कोरोनाग्रस्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तर दुसऱ्या रुग्णाला घरामध्ये आयसोलेट करण्यात आलं. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार क्षमता मजबूत नाही त्यांच्यावर व्हायरस पुन्हा हल्ला करत आहे. 10 / 16कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास शरीरात असलेला व्हायरस पुन्हा शरीरात पसरतो आणि पुन्हा कोरोनाची लागण होते. 11 / 16तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारानंतर कोरोनातून बऱ्या झालेल्या जवळपास 14 टक्के लोकांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. 12 / 16कोरोनाचा धोका पुन्हा निर्माण होत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 16देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे 50 लाख कोरोनाबाधितांपैकी 39 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशामध्ये कोरोनाचे 9 लाख 95 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.14 / 16देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांवर आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे 20 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. 15 / 16कोरोनाबाबत सिरो सर्व्हेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेनुसार कोरोनामुक्त झालेल्या 30 टक्के रुग्णांमध्ये अँटीबॉडी दिसून आलेल्या नाहीत. 16 / 16कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असल्याचे गृहितक खोटे ठरले आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचेही समोर आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications