CoronaVirus Marathi News results first national sero survey till may 64 lakh people corona
CoronaVirus News : बापरे! मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, ICMRचा धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 9:02 AM1 / 14देशात दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. कोरोना चाचण्या, क्वारंटाईन, मास्क, सोशल डिस्टंसिंग याच्या माध्यमातून काळजी घेतली जात असतानाच रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. 2 / 14देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांचा निकाल समोर आला आहेत. यामधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 / 14मे महिन्याच्या सुरुवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 4 / 14सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती. कोरोनाची जेव्हा देशभर लॉकडाऊन सुरू होता तेव्हा कोरोनाची अशी अवस्था होती.5 / 14सीरो सर्वेक्षणातून ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे.6 / 14रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही किंवा कमी रुग्ण आढळले अशा ठिकाणी कोरोना चाचण्याच कमी प्रमाणात झाल्या असाव्यात. 7 / 14चाचण्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. जेणेकरून रुग्णांबाबत माहिती मिळणं सोपं होतं. तसेच काही ठिकाणी लॅब वाढण्याची गरज असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.8 / 14ग्रामीण भागात सेरो पॉझिटिव्हिटीचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 69.4 टक्के होतं तर शहरी झोपडपट्ट्यांमध्ये ते 15.9 टक्के आणि शहरी नसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये 14.6 टक्के नोंदवलं गेलं आहे. 9 / 1418-45 वर्षे (43.3) वयोगटात सीरो पॉझिटिव्हिटी सर्वाधिक असून 46-60 वर्षे (39.5) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांत कमी सेरो पॉझिटिव्हिटी आहे.10 / 14एकूण संक्रमित झालेल्यांपैकी 18.7 टक्के लोक हे सगळ्यात जास्त धोका असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येत होते. अनेक जिल्ह्यांमध्ये हे संक्रमण कमी होतं. 11 / 14भारत हा तेव्हा महाभयंकर संकटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता. असंख्य लोकांना अजूनही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे कन्टेंनमेंट झोनवर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं समोर आलं आहे. 12 / 1411 मे ते 4 जून या वेळेत देशातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 700 गावे व प्रभागांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 14कोरोनामुळे देशामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर येत आहेत. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. 14 / 14कोरोनाच्या लढ्यात अनेकांनी हे युद्ध जिंकलं असून कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications