CoronaVirus Marathi News right time remove lockdown aiims doctors SSS
CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 4:55 PM1 / 15भारतातील कोरोना व्हायरसचा संसर्ग अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 535 झाली आहे. 2 / 15देशात आतापर्यंत 5 हजार 394 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 91 हजार 818 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी देशभरात पुन्हा एकदा आठ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. 3 / 15सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. 4 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने लॉकडाऊन 5 आणि अनलॉक 1 ची घोषणा केली. 5 / 15एकीकडे लॉकडाऊन हटवल्याता लोकांमध्ये आनंद आहे. तर दुसरीकडे यामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वेगानं तर होणार नाही ना? याची भीती निर्माण झाली आहे. 6 / 15भारताच्या ICART (India Covid19 Apex Research Team) या टीमने लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा याबाबत अभ्यास केला आहे. AIIMSच्या डॉक्टरांनी लॉकडाऊन हटवण्याची योग्य वेळ सांगितली आहे.7 / 15AIIMSचे डॉक्टर गिरीधर गोपाल परमेश्वरन, मोहकृत गुप्ता, सप्तर्षी सोहम मोहंता आणि त्यांच्या टीमचा यामध्ये समावेश आहे. सरकारने आता आपली आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 8 / 15देशात अचानक लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याची चिंता आहे. जगात ज्या गतीने कोरोनाग्रस्तांच्या संख्या वाढत आहे. मात्र तशी परिस्थिती भारतात नाही आहे. 9 / 15भारतातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र लॉकडाऊन हटवल्यास लोक घराबाहेर पडतील यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होऊ शकतो. 10 / 15देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या 7 दिवसांच्या रोलिंग एव्हरेजमध्ये अद्याप घट दिसून आलेली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन शिथिल करणे योग्य नाही.11 / 15चीनमधील परिस्थिती पाहता टीमनं चीनमध्ये हा संसर्ग जवळजवळ संपला होता, मात्र कोरोनाने पुन्हा शिरकाव केला. 13 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये 15,133 प्रकरणे नोंदली गेली. 12 / 15दोन महिन्यांनंतर चीनने लॉकडाऊन हटवला. लॉकडाऊन शिथिल केला तर पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. 13 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्यांची आवश्यकता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 14 / 15कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. मात्र देशात आता सामुहिक संक्रमणाचा धोका वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी दावा केला आहे. 15 / 15देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. भारत जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकत कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications