CoronaVirus Marathi News tips for traveling in special trains SSS
CoronaVirus News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! सोपा नसणार रेल्वेप्रवास, 'या' गोष्टी जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 1:38 PM1 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान भारतीय रेल्वेने 12 मेपासून पुन्हा प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.2 / 15सुरुवातीला 15 रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या केवळ 15 जोड्याच (30 फेऱ्या) धावणार असल्याची अशी माहिती रेल्वे विभागाने रविवारी एका निवेदनाद्वारे दिली. 3 / 15नवी दिल्ली स्थानकातून दिब्रुगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावीला जोडणाऱ्या या रेल्वे असतील.4 / 15रेल्वेने प्रवास करणार असाल तर काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण लॉकडाऊनदरम्यानचा हा प्रवास सोपा नसणार आहे. कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया.5 / 15रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला सोमवारी (11 मे) सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाईटवरूनच या गाड्यांचे तिकीट बूक करता येईल.6 / 15रेल्वेने प्रवास करताना सर्व प्रवाशांना मास्क वापरणं अनिवार्य आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. तोंड झाकण्यासाठी रुमाल आणि स्कार्फचा वापर करता येईल.7 / 15प्रवास करण्याआधी जवळपास एक किंवा दोन तास लवकर रेल्वे स्टेशनवर पोहचणं गरजेचं आहे. प्रवाशांचं स्क्रिनिंग केलं जाणार आहे. निर्गमनाच्या (डिपार्चर) ठिकाणी स्क्रिनिंग करून घेणे बंधनकारक आहे.8 / 15कोरोनाची लक्षण असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी नाही. थोडासा जरी ताप असेल किंवा तब्येत बरी नसेल तर तिकीट बूक करू नका.9 / 15रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणं अनिवार्य आहे. याशिवाय बोर्डिंग मिळणार नाही.10 / 15रेल्वे स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांसाठी स्थानकांवरील तिकीट बुकिंग काउंटर्सवरून तिकीट मिळणार नाही. 11 / 15ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट आहेत, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच रेल्वेने प्रवास करू शकतात. 12 / 15स्पेशल ट्रेन या देण्यात आलेल्या स्टॉपव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी प्रवाशांसाठी थांबणार नाहीत.13 / 15सर्व स्पेशल ट्रेन या एसी कोचसह चालवण्यात येणार आहेत. या ट्रेनमध्ये कोणाही डबा हा जनरल असणार नाही.14 / 15रेल्वे आणखी काही मार्गांवरही विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मात्र, हे उपलब्ध कोचेसवर अवलंबून आहे. कारण 20,000 कोचेस, कोरोना केअर सेंटर म्हणून रिझर्व आहेत.15 / 15'श्रमिक स्पेशल'च्या रुपात रोज 300 रेल्वे गाड्या चालवण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर कोचेस रिझर्व आहेत, असेही रेल्वे विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications