CoronaVirus Marathi News total 5,53,471 cured from corona in india
CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा उद्रेक होत असताना 'ही' आकडेवारी सुखावणारी By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:30 PM1 / 15देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 28,701 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 8 लाखांचा टप्पा पार केला आहे. 2 / 15कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 500 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 23,174 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.3 / 15कोरोनामुळे देशातील परिस्थीत गंभीर झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 8,78,254 वर गेला आहे. 4 / 15देशात सध्या 3,01,609 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. 5 / 15देशात देखील कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त चार दिवसांत तब्बल एक लाख नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून रुग्णांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा पार केला. 6 / 15देशात कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून त्यावर मात केली आहे. 7 / 15देशातील पाच लाख लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. तब्बल 5,53,471 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 8 / 15भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63 टक्के झाले आहे. दिलासादायक म्हणजे जगभरात भारताचा रिकव्हरी रेट हा सर्वाधिक आहे. 9 / 15देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात आतापर्यंत तब्बल एक कोटी लोकांनी कोरोना चाचणी केली आहे.10 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याने अधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे.11 / 15देशात होम आयसोलेशन, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, मास्कच्या माध्यमातून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहे. प्रशासनाने लोकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे.12 / 15चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत चालला आहे. 13 / 15अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतपर्यंत जगभरात तब्बल 7,588,510 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.14 / 15कोरोनामुळे आतापर्यंत 571,698 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 13,042,340 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.15 / 15कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देश सज्ज झाले आहेत. कोरोनावरील लस आणि औषध शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर काम सुरू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications