1 / 15जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.2 / 15देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.3 / 15कोरोनाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांवरीलच्या उपचारासाठी सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. एका प्रभावी औषधाचा डोस कमी केला आहे. 4 / 15देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांचे तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे. यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) रेमडेसिव्हर (Remdesivir) आणि फेवीपिरवीर (Favipiravir) औषधांची निर्मिती करणार आहे. 5 / 15अनेक ठिकाणी रेमडेसिव्हरची क्लिनिकल चाचणी झाली असून परिणाम चांगले आले आहेत. रुग्णांवर ते प्रभावी ठरत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र आता त्याचा डोस कमी करण्यात आला आहे. 6 / 15रेमडेसिव्हर हे औषध रुग्णांना 6 दिवसांऐवजी 5 दिवस दिले जाणार आहे. रेमडेसिव्हिर एक अँटी-व्हायरल औषध आहे आणि कोरोनाबाधितांना हे औषध दिले जाते. 7 / 15केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली.आरोग्य मंत्रालयाच्या नवीन प्रोटोकॉलनुसार हे औषध इंजेक्शन स्वरूपात रुग्णांना दिले जाईल.8 / 15पहिल्या दिवशी, रूग्णाला इंजेक्शनच्या स्वरूपात 200 मिलीग्राम रेमडेसिव्हिरचा डोस दिला जाईल, त्यानंतर पुढील चार दिवस 100-100 मिलीग्राम डोस रुग्णाला देण्यात येईल.9 / 1513 जून रोजी आरोग्य मंत्रालयाने रेमडेसिव्हिर वापरण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीत रेमडेसिव्हिरच्या वापरास मर्यादित वापराखाली परवानगी दिली होती. 10 / 15किडनी, लिव्हरच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना, गर्भवती महिला, स्तनपान देणाऱ्या महिला आणि 12 वर्षाखालील मुलांना हे औषध देण्यात येणार नाही.11 / 15आरोग्य मंत्रालयानेही हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन विषयी सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की या औषधाचा वापर रोगाच्या सुरुवातीच्या काळात असावा. हे औषध गंभीर आजारी व्यक्तीस दिले जाऊ नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 15कोरोना संक्रमणामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर आता देता येईल. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावरील उपचारांत रेमडिसिव्हिर सामील केल्याने हे रुग्ण लवकर बरे होण्यास मोठी मदत मिळणार आहे.13 / 15रेमडिसिव्हिर हे औषध 100 मिलिग्रॅम इंजेक्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. या औषधासाठी हेट्रो कंपनीने अमेरिकेच्या गिलियड सायन्सेस या कंपनीसोबत करार केला आहे. 14 / 15DCGI ने रेमडेसिव्हिर तयार करण्यासाठी सिप्ला आणि हेट्रो हेल्थकेअर या कंपन्यांना परवानगी दिली आहे. या औषधांचा वापर आपातकालीन स्थितीत केला जातो.15 / 15कोविड-19 वर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.