CoronaVirus Marathi News vaccination doesnt guarantee 100 protection wearing mask is must experts
"कोरोना लसीकरण 100 टक्के सुरक्षेची हमी देत नाही, मास्क वापरणं अत्यंत आवश्यक"; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 6:44 PM1 / 13जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यास भारत सज्ज झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. कोरोनावरील लसी विकसित करणाऱ्या शास्रज्ञांचे मोदींनी अभिनंदन केलं.2 / 13कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी परवानगी दिल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी हे वक्तव्य केले. मेट्रॉलॉजी परिषदेमध्ये मोदी म्हणाले की, विकसित झालेल्या कोरोना लसी भारतात बनल्या असून, त्याचा देशाला सार्थ अभिमान आहे. शास्रज्ञ व तंत्रज्ञांनी दिलेल्या योगदानामुळेच ही गोष्ट शक्य झाली.3 / 13कोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.4 / 13लसीकरण करणाऱ्या एका टीममध्ये पाच जणांचा समावेश असणार आहे. कोरोना लसीच्या साठ्याबाबत माहिती देताना राजेश भूषण यांनी देशात कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे प्राथमिक लस स्टोअर बनविण्यात आल्याचं म्हटलं आहे. 5 / 13लवकरच देशात लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. मात्र याच दरम्यान तज्ज्ञांनी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. लसीकरण 100 टक्के सुरक्षेची हमी देत नाही. मास्कचा वापर करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. 6 / 13संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच सुरक्षित अंतर ठेवणं व कोरोना संसर्गास आळा बसण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचं असल्याचं देखील म्हटलं आहे.7 / 13मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. भरेश देधिया यांनी भारतात लवकरच लसीकरण मोहीम सुरू होत आहे, 2022 च्या अगोदर बहुतांश जणांचे लसीकरण झालेले असेल. तोपर्यंत मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्स व कामाशिवाय घराबाहेर न पडणं हे महत्वाचं आहे असं म्हटलं आहे.8 / 13तज्ज्ञांना कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तीने देखील मास्क लावणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. कारण लस ही 100 टक्के सुरक्षेची खात्री देत नाही. त्यात सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 13देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,95,278 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,346 नवे रुग्ण आढळून आले असून 222 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,50,336 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. 10 / 13कोरोनाबाबतची सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. देशातील एक कोटींहून अधिक लोकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई जिंकली आहे. 11 / 13कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात भारी असून देशाचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट 96.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. 12 / 13सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 44 पटींनी जास्त आहे. सध्या देशात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 2,28,083 इतके आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून एकूण 51 टक्के बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आहे. 13 / 13कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा मृत्युदर 1.45 टक्के आहे. 6 जानेवारी 2021 पर्यंत संपूर्ण देशभरातून 17 कोटी 84 लाख 995 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications