CoronaVirus Marathi News why corona cases growing fast india icmr says reason
CoronaVirus News : देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे 'हे' आहे कारण, ICMR ने दिला गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:11 AM1 / 15जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश हे कोरोनाच्या संकटांचा सामना करत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. 2 / 15कोरोनाच्या संकटाचा अनेक देश सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींच्या वर गेली असून रुग्णांची एकूण संख्या 24,058,354 आहे. 3 / 15कोरोनामुळे आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 823,510 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16,608,018 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 4 / 15कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात असताना दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 5 / 15देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 31 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.6 / 15कोरोनासंदर्भात अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून सातत्याने नवनवीन माहिती मिळत आहे. देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण समोर आलं आहे.7 / 15ICMR (आयसीएमआर) ने कोरोना संदर्भात गंभीर इशारा दिला आहे. ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी देशात कोरोनाचा प्रसार होण्यामागची काही कारणं सांगितली आहेत. 8 / 15भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास काही बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असं बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. 9 / 15भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देत त्यांनी देशातली कोरोना परिस्थितीची माहिती दिली. तसेच आयसीएमआरने दुसऱ्या राष्ट्रीय सीरो सर्व्हेला सुरुवात केल्याचंही म्हटलं आहे. 10 / 15सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण होईल असं भार्गव यांनी म्हटलं आहे. काही बेजाबदार लोकांमुळे देशात कोरोनाचा प्रसार हा वेगाने होत आहे. 11 / 15कोरोनाच्या संकटात मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र काही लोक या गोष्टींचं पालन करत नाहीत त्यामुळेच व्हायरसचा प्रसार होत असल्याची माहिती मिळत आहे.12 / 15देशामध्ये कोरोना लसीवरही संशोधन सुरू असून चाचण्यांना यश येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 15कोरोनावर अनेकांनी यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. 14 / 15देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्या ही आता 31 लाखांच्या वर गेली असून सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. 15 / 15देशाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढले असून 74.69 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 1.87 टक्के आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका, ब्राझील नंतर आता भारताचा तिसरा क्रमांक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications