CoronaVirus Marathi News world health organization issued new guidelines mask
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 2:50 PM1 / 18जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.2 / 18कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. तर इटली, स्पेन, युरोपमधील परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे.3 / 18भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 68 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.4 / 18भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 236657 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 6642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.5 / 18कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.6 / 18कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.7 / 18सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तोंडाला मास्क लावण्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. 8 / 18WHO ने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन ज्या ठिकाणी होत नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे. 9 / 18नव्या गाईडलाईन्समध्ये हे मास्क कसे असावेत आणि त्यासाठी कोणतं साहित्य वापरण्यात यावं याबाबतही माहिती देण्यात आली आहे. तसेच मास्कच्या गुणवत्तेबाबतही सांगण्यात आले आहे. 10 / 18फेस मास्क हे तुम्ही घरीच तयार करू शकता किंवा दुकानातून अथवा मेडिकलमधूनही खरेदी करू शकता. हे मास्क खरेदी करताना ते कापडी असावेत याची काळजी घ्या. 11 / 18घरी मास्क तयार करताना त्यामध्ये तीन लेअर असावेत. गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे. 12 / 18मास्क वापरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल. रेल्वे, बस, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं गरजेचं आहे.13 / 18WHO चे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस एडहेनॉम यांनी फक्त फेसमास्कवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे असं म्हटलं आहे. यासाठी इतर उपाययोजना आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे. 14 / 18आरोग्याची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि इतर उपाययोजना, सॅनिटाईज करणंही महत्त्वाचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 15 / 18सोशल डिस्टंन्सिंग शक्य नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना जपानमधील आरोग्य तज्ज्ञांनी मात्र पालकांना लहान मुलांना मास्क घालू नका असा सल्ला दिला आहे.16 / 18दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क धोकादायक ठरू शकतं असं जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांना सावध केलं आहे.17 / 18दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नका, त्यांना समस्या उद्भवू शकतात अशी सूचना जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांसाठी जारी केली आहे.18 / 182 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं बंद करा. लहान मुलांचा एअर पॅसेज लहान असतो. मास्क घातल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो असं त्यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications