शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : आयुष मंत्रालयाकडून चार आयुर्वेदिक औषधांची चाचणी, कोरोनाविरोधात ठरू शकतात निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 3:52 PM

1 / 12
कोरोना व्हायरसविरोधातली लढाई जिंकण्यासाठी आयुष मंत्रालय आयुर्वेदाच्या चार औषधांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर चाचण्या घेणार आहे.
2 / 12
दोन दिवसात सुरू होणारी ही चाचणी 12 आठवडे चालणार आहे आणि 1000 रुग्णांवर प्रयोग केला जाणार आहे.
3 / 12
आयुष मंत्रालय आणि सीएसआयआर मिळून ही चाचणी घेत आहेत. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, आरोग्य मंत्रालय, आयुष मंत्रालय व सीएसआयआर यांनी मिळून तीन प्रकारे यावर अभ्यास केला आहे.
4 / 12
या चार औषधांवरील चाचण्या देशभर सुरू करत आहोत. आम्ही अत्यंत मोठ्या नमुन्यांवर अभ्यास करीत आहोत, असं राजेश कोटेचा यांनी सांगितलं आहे.
5 / 12
ज्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे किंवा जास्त जोखीम असलेल्या रुग्णांच्या नमुन्यांवर हा अभ्यास सुरू आहे.
6 / 12
पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आयुष मंत्रालय या औषधांच्या माध्यमातून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासंदर्भात ५० लाख लोकांवर प्रयोग करण्याच्या विचारात आहे.
7 / 12
विशेष म्हणजे ही चारही औषधे आयुर्वेदातील असल्यानं त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
8 / 12
मुंबई, पुणे येथे होमिओपॅथी चाचणी सुरू झाली आहे. योगाची चाचणीदेखील सुरू झाली.
9 / 12
प्राथमिक टप्प्यात या चाचणीसाठी 1000 रुग्णांचे नमुने घेतले गेले असून, त्याआधारेच प्रयोग घेतले जात आहेत.
10 / 12
जे कोरोना रुग्ण आहेत त्यांच्या 1000 नमुन्यांवर 12 आठवडे अभ्यास केला गेला आहे.
11 / 12
पुढील दोन दिवसांत चाचणी घेण्यास सुरुवात होईल. ही अशी औषधे आहेत जी रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात, ज्याद्वारे चाचण्या केल्या जातील.
12 / 12
अश्वगंधा, गुडूची (गुलबेल) पीपली, मुलठी, आयुष 64 या चार औषधांवर आमचं संशोधन सुरू आहे. या औषधांद्वारे चाचण्या केल्या जातील.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस