coronavirus: This is my India ... fodder for parties even though the house is closed
coronavirus: ये मेरा इंडिया... घरात बंद असूनही पक्षांसाठी चारा-पाण्याची सोय By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 8:08 PM1 / 10लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरात बसले आहेत. मात्र, पक्षीप्रेमी अन् प्राणी मित्रांकडून आपली जबाबदारी किंवा कर्तव्य निष्ठेनं पार पाडलं जात आहे. 2 / 10कोरोनाच्या लॉकडाऊन काळात घरात बसून पुण्य कमवायची हीच ती वेळ...3 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार १४ एप्रिलपर्यंत देशात लॉक डाऊन करण्यात आलंय. त्यामुळे कुणीही इच्छा असो वा नसो.. घराबाहेर पडूच शकत नाही. 4 / 10तसेच कोरोनाबद्दलचं गांभीर्य आता नागरिकांमध्ये दिसून येतंय, त्यामुळे लोकंही घराबाहेर पडत नसून स्वत:हूनच घरात बसण्याचं आवाहन सर्वांना करत आहेत.5 / 10नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे पक्ष आणि प्राणीमित्रांची पाण्यासाठी, तहान भागविण्यासाठी ओढाताण होते. पक्ष्यांची ही ओढाताण प्राणी मित्रांनी समजून घेत पक्षांसा दाना-पाण्याची सोय केली जातंय.6 / 10कोरोनाच्या काळात अनेकदा माणूसकीच दर्शन घडतंय. बऱ्याचदा पोलिस बांधवांकडूच हे पाहायला मिळते. पोलीस बांधवही अशा प्राणी अन् पक्षांसाठी चारा-पाण्याची सोय करतात. 7 / 10 कोरोनामुळे माणूस घरात बसला आहे, पण घराबाहेर असलेल्या पक्षांसाठी घराबाहेर पाणी ठेवताना दिसून येतोय. तसेच, ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडूनही याकडे जातीनं लक्ष दिलं जात असल्याचं दिसतंय. 8 / 10तरी आपल्या घराबाहेर किंवा छताबाहेर नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची व त्यांच्यासाठी अन्नाची सोय करायला हवी. 9 / 10 आपण आपल्यासाठी किराणा भरण्यास दुकानात गर्दी केली, आता आपल्या घराबाहेर गर्दी करणाऱ्या पक्ष्यांसाठी घरातील दाळ, तांदुळ किंवा इतरही त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे अन्न ठेवून माणूसकी जपावी. 10 / 10पंछी नदीय पनव के झोके, कोई सरहद न इन्हे रोके... या गाण्यातील बोलीप्रमाणे आपल्या घराबाहेर येणाऱ्या पक्षांसाठी आपलं प्रेमळ रुप दाखवून द्याव. आणखी वाचा Subscribe to Notifications