CoronaVirus Nasal Vaccine bharat biotech intranasal vaccine trial completed corona big achievement
Nasal Vaccine : स्वातंत्र्यदिनी खूशखबर! कोरोनाच्या लढाईला मोठं यश; भारताच्या पहिल्या Nasal Vaccine चं ट्रायल पूर्ण By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 5:47 PM1 / 11देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14,917 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात पाच लाखांहून अधिक लोकांनी आपली जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. 2 / 11देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठे यश हाती आले आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या BBV-154 इन्ट्रानेझल लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आता पूर्ण झाली आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून देण्यात येण्याची शक्यता आहे. नाकावाटे (Nasal Vaccine) ही लस देण्यात येणार आहे. 3 / 11मिळालेल्या माहितीनुसार, BBV-154 इन्ट्रानेझल लसीची पहिली आणि दुसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणी दरम्यान, पहिला आणि दुसरा डोस म्हणून लस देण्यात आली होती. बुस्टर डोस म्हणून देखील या लशीची चाचणी करण्यात आली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींवर चाचणी करण्यात आली. 4 / 11तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. पहिल्या डोसच्या चाचणीसाठी अनेक पातळीवर चाचणी करण्यात आली होती. या दरम्यान सुरक्षा आणि इम्युनोजेनेसिटीच्या प्रत्येक पैलूंची तपासणी करण्यात आली होती. याची तुलना COVAXINO सोबत करण्यात आली. भारत बायोटेकने संपूर्ण भारतात 14 ठिकाणी लस चाचणी केली होती. 5 / 11कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. त्यामुळे लसीचा चांगला परिणाम दिसून आला. कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरण्याचे संकेत दिसून आले. Intra Nasal Vaccine च्या बुस्टर डोससाठी 9 ठिकाणी चाचणी करण्यात आली. भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे. 6 / 11केंद्र सरकारने गेल्या वर्षी मिशन कोविड सुरक्षा सुरू केली होती. कोरोना लसीवर अधिक वेगाने काम करता यावे, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. सामान्यांना एक सुरक्षित, प्रभावी, स्वस्त दरात लस उपलब्ध होईल यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. देशभरात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 11कोरोनामुळे अनेक राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. असं असतानाच आता राजधानी दिल्लीनंतर पंजाबमध्येही मास्क सक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांच्या सरकारने कोरोना नियमावली जारी केली आहे, त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. 8 / 11पंजाब सरकारनेच्या गृह विभागाकडून सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पंजाब सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कोरोना गाइडलाईनमध्ये सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याबाबातही सांगण्यात आले आहे. 9 / 11सर्व नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस अथवा बूस्टर डोस घेण्याबाबातही आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, त्यांनी तात्काळ चाचणी करावी, तसेच विलगीकरणात राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी धुंकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 10 / 11दिल्लीमध्येही मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात येईल, असाही निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने खबरदारीच्या दृष्टीने आता पावलं उचलली आहे. 11 / 11पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू केली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचे पालन न कऱणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच खासगी चारचाकी गाडीने जर प्रवास करत असाल तर मास्क न घातल्यास दंड आकारला जाणार नाही असं म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नियमावलीचं पालन करा असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications