शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : धोका वाढला...! भारतात ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णात दिसून आली ही 3 लक्षणं; तुम्हीही व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 1:52 PM

1 / 9
कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रॉन व्हेरिअंट (Omicron Variant) हळू-हळू संपूर्ण देशात पसरत चालला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा निर्बंधांचे युग सुरू झाले आहे.
2 / 9
भारतातही या व्हेरिअंटचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकात आढळून आले आहेत. मात्र यातच आरोग्य मंत्रालयाने लोकांना भयभीत न होण्याचे आवाहन करत, सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
3 / 9
भारतात कसा पोहोचला ओमायक्रॉन व्हेरिअंट - कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही प्रकरणं डेल्टा प्रकाराशी जुळत नव्हती. यामुळे केंद्राला सतर्क करण्यात आले. यांपैकी एक रुग्ण 66 वर्षीय पुरुष असून तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. तो 20 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये आला होता. येथे त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याला एका हॉटेलमध्ये आयसोलेट करण्यात आले होते. यानंतर, 23 नोव्हेंबरला त्या रुग्णाची पुन्हा टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. यानंतर 27 नोव्हेंबरला तो दुबईला गेला. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.
4 / 9
तर ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण 46 वर्षीय डॉक्टर आहे. ते एका सरकारी रुग्णालयात काम करतात. पण त्याची कुठल्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही.
5 / 9
ओमायक्रॉन व्हेरिअंटचे लक्षण (Symptoms of Omicron Variant)- 46 वर्षीय डॉक्टरने खूप जास्त थकवा, अशक्तपना आणि ताप अशी लक्षणं दिसल्यानंतर आपली टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. रिपोर्टनुसार, त्यांची सायकल थ्रेशहोल्ड व्हॅल्यू (CT value) कमी होती. यानंतर त्यांचे सॅम्पल लॅबमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांची टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली आहेत.
6 / 9
दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनीही म्हटले आहे की, या व्हेरिअंटची लक्षणे फारशी गंभीर नाहीत. तथापि, सौम्य लक्षणांमुळे, बहुतेक लोकांना ती लवकर समजत नाहीत आणि संसर्ग सहजपणे पसरण्याची शक्यता असते. यामुळे, जर तुम्हाला यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आली, तर नक्कीच स्वतःची टेस्ट करून घ्या.
7 / 9
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे, की 'ओमायक्रॉन कसा पसरतो हे अद्याप सांगता येणार नाही. तथापि, काळजी करण्यासारखे काही नाही, कारण सर्व 6 जणांची ओळख पटली आहे आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारची मोठी समस्या आढळून आलेली नाही. डेल्टा व्हेरिअंटमध्ये श्वासोच्छवासाची गंभीर समस्या निर्माण होत होती, हे आपण पाहिले. मात्र, ओमायक्रॉनमध्ये अद्याप तसे कुठलेही लक्षण दिसलेले नाही. त्याची लक्षणे अतिशय सौम्य आहेत.
8 / 9
कर्नाटकातील अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे, राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण जी दुसरी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली, तिची कसल्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. सर्वच प्रकरणांत विशेष अशी लक्षणं आढळून आलेली नाहीत.
9 / 9
तज्ज्ञांच्या मते, या सर्वच प्रकरणांत CT value कमी आढळून आल्याने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. (सर्व फोटो - सांकेतिक)
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसKarnatakकर्नाटक