CoronaVirus News: 222315 new corona cases and 4454 deaths in last 24 hrs in india
CoronaVirus News: देशातील परिस्थिती सुधारतेय; पण त्या आकड्यानं पुन्हा चिंता वाढवली By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 9:58 AM1 / 8देशात दिवसभरात २ लाख २२ हजार ३१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ वर पोहचली आहे. देशात सध्या २७ लाख २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहे. 2 / 8 देशातील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मात्र मृतांचा आकडा चिंता वाढवणारी आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४४५४ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची एकूण संख्या तीन लाखांच्याही पुढे गेली आहे. 3 / 8देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ वर पोहचली आहे. देशात सध्या २७ लाख २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ०२ हजार ५४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.4 / 8 इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार २२ मेपर्यंत ३२ कोटी ८६ लाख ७ हजार ९३७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात शनिवारी तपासलेल्या २१ लाख २३ हजार ७८२ नमुन्यांचाही समावेश आहे.5 / 8तत्पूर्वी, अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारतात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या तीन लाखांवर गेली आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत. गत दोन महिन्यांत ही संख्या वाढली आहे.6 / 8 देशात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता ३,००,३१२ झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने ६ लाखांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४.४८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 / 8त्यापाठोपाठ मेक्सिकोत २.२१ लाख, इंग्लंड १.२७ लाख, इटली १.२५ लाख, रशिया १.१८ लाख आणि फ्रान्समध्ये १.०८ लाख लोकांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.8 / 8अन्य देशांच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी आहे. इटली २.९९ टक्के, इंग्लंड २.८७ टक्के, ब्राझील २.७९ टक्के, जर्मनी २.३९ टक्के, रशिया २.३५ टक्के, स्पेन २.१९ टक्के, फ्रान्स १.८५ टक्के, अमेरिका १.७८ टक्के, भारत १.१२ टक्के आणि तुर्कीचा मृत्यूदर ०.८८ टक्के आहे. सध्या देशात दर १०० रुग्णांमागे एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक बळी दुसऱ्या लाटेत गेले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications